शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

गार्डीजवळ अपघात; दोन ठार

By admin | Updated: June 9, 2014 00:57 IST

व्हॅनची ट्रकला धडक : मृत जेजुरीचे; मध्यरात्रीची घटना

विटा (जि. सांगली) : सांगली जिल्ह्यातील गार्डी (ता. खानापूर)जवळ ट्रेलर ट्रक व व्हॅन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील दोघेजण ठार झाले. ही घटना काल, शनिवारी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. योगेश बाळासाहेब दरेकर (वय ३३) व प्रवीण सदाशिव पवार (४०, दोघेही रा. चिंचेच्या बागेजवळ, जेजुरी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. यातील प्रवीण हे जागीच ठार झाले, तर योगेश यांचा कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी (ता. पुरंदर) येथील योगेश दरेकर यांची विटा ही सासुरवाडी आहे. त्यांची पत्नी प्रसूतीसाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विटा येथे माहेरी आली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वीच योगेशला कन्या झाली. त्यामुळे शनिवारी सकाळी योगेश कन्येला पाहण्यासाठी प्रवीण पवारसह विट्यात आले होते. शनिवारी रात्री जेवण आटोपून हे दोघेजण त्यांच्या व्हॅनने (एमएच १२, एम-८४८१) विट्यातून मायणीमार्गे जेजुरीकडे चालले होते. त्यावेळी व्हॅनच्या पुढे विट्याहून गार्डीकडे जाणाऱ्या ट्रेलर ट्रकने (एमएच १८, एम-८८४३) खानापूर तालुक्यातील गार्डी गावातून डाव्या बाजूला नेवरी रस्त्याकडे अचानक वळण घेतले. ट्रकची लांबी जास्त असल्याने ट्रकचालकाने प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे वळण घेऊन ट्रक आडवा मारला. त्यावेळी व्हॅनचालकाचा अंदाज चुकल्याने व्हॅन ट्रकच्या पुढील बाजूस जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, व्हॅनचालकाच्या बाजूला बसलेले प्रवीण सदाशिव पवार जागीच ठार झाले, तर चालक योगेश दरेकर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच योगेश यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गंभीर जखमी योगेश यांना त्यांचे मेहुणे धनंजय कदम यांनी प्रथम विट्यात व नंतर कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच योगेश यांचा मृत्यू झाला. आज, रविवारी सकाळी विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या दोघांवर रविवारी दुपारी जेजुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, चार बहिणी; तर प्रवीण यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे. या अपघाताची नोंद विटा पोलिसांत झाली असून अधिक तपास हवालदार महादेव खोत करीत आहेत. (वार्ताहर)