शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine-ऑन लाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी मात्र गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 12:05 IST

Corona vaccine Sangli : जिल्ह्याबाहेरील काही लोक ऑनलाइन  नोंद करूनही लसीकरणासाठी उपस्थित राहत नाहीत. खोडसाळपणा करणाऱ्या या लोकांची यादी देऊन  संबधित ग्रामीण रुग्णालयाजवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कडेगाव  तालुक्यातील नागरिकांतून होत आहे. 

ठळक मुद्देऑन लाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी मात्र गैरहजरऑनलाईन खोडसाळणा करणाऱ्यावर कारवाईची गरज  : गरजूंचीही घालवितात संधी 

 प्रताप महाडीक

कडेगाव : राज्यात १८ ते ४५  वयोगटातील व्यक्तींना कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. मात्र जिल्ह्याबाहेरील काही लोक ऑनलाइन  नोंद करूनही लसीकरणासाठी उपस्थित राहत नाहीत. या लोकांना ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर फोन करून  बोलवून घेत आहेत तरीही फोन न उचलणे, उलट-सुलट बोलणे असे प्रकार घडत आहेत. हे प्रकार सर्वत्र घडत आहेत. यामुळे आपत्तीच्या काळातही खोडसाळपणा करणाऱ्या या  लोकांची यादी देऊन  संबधित ग्रामीण रुग्णालयाजवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कडेगाव  तालुक्यातील नागरिकांतून होत आहे. वास्तविक ऑन लाईन नोंदणीसाठी अनेक अडथळे निर्माण होत असल्यामुळे  ग्रामीण भागातील लोकांची डोकेदुखी होत आहे.दररोज रात्री ८ नंतर लसीकरणासाठी दिलेल्या लिंकवरून पुढील दिवसाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. मात्र काही सेकंदात संबधीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध लसीच्या संख्येइतक्या लोकांची नोंद होते.यामुळे  मोबाईल रेंज अभावी तसेच सर्व तांत्रिक  बाबींची माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी लोकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही.या काळात  रुग्णालयापासून दूरवरच्या अंतरावरील कित्येक लोक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतात.सर्वानाच लस घेण्याचा आणि आपल्याला हवे त्या रुग्णालयाची निवड करण्याचा आणि अगदी वेळेची निवड करण्याचाही  हक्क आहे .मात्र नोंदणी केलीच आहे तर संबंधित लोकांनी लसीकरणासाठी उपस्थित राहण्याची गरज आहे.संबधित लोकांच्या खोडसाळपणामूळे व विकृत वर्तनामुळे रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील गरजू लोकांना लस मिळत नाही.यावर राज्यस्तरावर ठोस निर्णय घेऊन संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत..... त्या लसींचा साठा रुग्णालयात शिल्लक लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी  गैरहजर राहत असलेल्या लोकांची संख्या सरासरी १० टक्के आहे.असे रुग्णालयांमध्ये  माहिती घेतली असता समजले.संबधित लोकांसाठी उपलब्ध असलेल्या लसींचा साठा रुग्णालयांमध्ये शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या लसीची नोंद  ठेऊन ऑफलाइन पद्धतीने देण्याची परवानगी संबधित रुग्णालयांना द्यावी अशी अपेक्षा स्थानिक गरजू नागरिक व्यक्त करित आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली