शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

सांगलीतील हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण

By admin | Updated: July 16, 2017 23:55 IST

सांगलीतील हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी हरिपूर (ता. मिरज) येथील हॉटेल व्यावसायिक विठ्ठल लक्ष्मण भोसले (वय ३४) यांचे अपहरण करुन, त्यांना खोलीत डांबून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. १४ जुलैला, शुक्रवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी सावकार सागर बाळासाहेब वठारे (रा. कर्नाळ रस्ता, सांगली) याच्यासह तिघांविरुद्ध रविवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल भोसले यांचे सराफ कट्ट्यावर हॉटेल आहे. २०१५ मध्ये त्यांनी सागर वठारे याच्याकडून महिन्याला दहा टक्के व्याजाने ९० हजार रुपये घेतले. आतापर्यंत त्यांनी व्याजापोटी एक लाख ६२ हजार रुपये दिले आहेत. तरीही अजून मुद्दल व व्याज असे एकूण साडेचार लाख रुपये देणे लागतोस, असे म्हणून त्याने भोसले यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. सर्व पैसे व्याजासह परत केल्याचे भोसले सांगत होते. पण वठारे पैसे वसुलीसाठी धमकावत होता. १४ जुलैला तो वसुलीसाठी त्यांच्या हॉटेलमध्ये गेला होता. पण भोसले यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे वठारेने त्याचा साथीदार कांच्या (पूर्ण नाव निष्पन्न नाही) व आणखी एक अनोळखी या दोघांच्या मदतीने भोसलेंचे अपहरण केले. तेथून त्यांना पंचमुखी मारुती रस्त्यावरील सम्राट मटण शॉपसमोरील एका इमारतील नेले. तिथे एका खोलीत कोंडून ठेवून लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. ‘मी पैसे देऊ शकत नाही’, असे भोसले यांनी सांगितले. तरीही वठारे व कांच्या या दोघांनी त्यांना लाथा-बुक्क्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच सोबतच्या तिसऱ्या अनोळखी संशयिताने त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्याकडून बँक आॅफ इंडियाचे सहा कोरे धनादेश घेऊन त्यावर सह्याही घेतल्या. ‘येत्या पाच महिन्यात पैसे नाही दिलेस, तर तुझ्या वडिलांच्या नावावरील जागा माझ्या नावावर करुन घेणार’, अशी धमकीही वठारे याने दिली. गेल्या एक महिन्यापासून वठारे हा भोसलेंना धमकावून मारहाण करीत आहे. पण दि. १४ रोजी त्याने फारच त्रास दिल्याने भोसले यांनी शहर पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. वठारे व त्याच्या साथीदारांना अद्याप अटक केलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे तपास करीत आहेत. वडील, भावाच्या सह्यावठारे याने पैसे वसुलीसाठी भोसलेंचे वडील लक्ष्मण व भाऊ रमेश या दोघांच्या मुद्रांकावर जबरदस्तीने सह्या व अंगठा घेतला आहे. पाच महिन्यांत साडेचार लाख रुपये दिले नाहीत, तर तो वडिलांच्या नावावरील जागा या मुद्रांकावरील सह्याच्या मदतीने स्वत:च्या नावावर करुन घेणार आहे, तशी त्याने धमकीही दिली आहे.