शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

सत्तेसाठी निष्ठेला अलविदा, सांगली जिल्ह्यात महिनाभरात कुणी कशा मारल्या कोलांटउड्या.. वाचा सविस्तर

By संतोष भिसे | Updated: October 23, 2024 17:55 IST

संतोष भिसे सांगली : जिल्ह्यातील विधानसभा तिकिटासाठी घायकुतीला आलेले इच्छुक अखेरच्या क्षणी कोणत्याही पक्षाच्या तंबूत आश्रय घेऊ लागले आहेत. ...

संतोष भिसेसांगली : जिल्ह्यातील विधानसभा तिकिटासाठी घायकुतीला आलेले इच्छुक अखेरच्या क्षणी कोणत्याही पक्षाच्या तंबूत आश्रय घेऊ लागले आहेत. गेली पाच वर्षे ज्या पक्षाच्या आणि संघटनेच्या ध्येयधोरणाचा प्रचार केला, त्याला पायदळी घेत प्रत्येकजण आमदारकीची झूल अंगावर चढविण्यासाठी शड्डू ठोकून तयार झाला आहे. इकता पक्षनिष्ठेचा भाव घसरला आहे.गेल्या पाच वर्षांत सांगली जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ - श्रेष्ठ नेते भाजपच्या वळचणीला गेले. अर्थात, वेगवेगळ्या निवडणुकांत त्यांनी भाजपचा प्रचार कितपत प्रामाणिकपणे केला, हे त्या - त्या वेळच्या निकालांतून दिसूनही आले. आता विधानसभेला पक्ष संधी देणार नाही. याची चिन्हे दिसू लागल्यावर त्यांनी कमळाला सोडचिठी देण्याची तयारी चालवलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मानाची पदे भूषविणारे तिकीट मिळत नाही म्हटल्यावर चक्क पक्षाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. लोकसभेला काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांचा जयजयकार करणारे आणि भाजपची निष्ठा पायदळी घेणारे नेते आता विधानसभेला भाजपचीच उमेदवारी मिळावी म्हणून उठाबशा काढताना दिसत आहेत.विशेषत: जत आणि मिरजेतील राजकारण दिवसागणिक बदलत आहे. नेत्यांचे विविध राजकीय रंग मतदारांची मती गुंग करीत आहेत. गेली २० वर्षे भाजपसोबत राहून भगव्या झालेल्या प्रा. मोहन वनखंडे यांनी आमदारकीसाठी शेवटच्या टप्प्यात जनसुराज्य आणि भाजपचा स्वतंत्र गट तयार केला. त्याचाही काही उपयोग होत नाही म्हटल्यावर थेट काँग्रेसचाच शेला गळ्यात अडकवून घेतला. जतमध्ये खुद्द भाजपमध्येच रणधुमाळी माजवली आहे. सांगलीत सुधीर गाडगीळ यांनी रितसर रिटायरमेंट जाहीर केल्याने अनेकांच्या आमदारकीच्या सुप्त इच्छा-आकांक्षा उफाळून आल्या. पण, पक्षाने गाडगीळ यांचाच मोहरा पुढे केल्याने हवा गेलेले फुगे सांगली - मुंबई - सांगली अशी पळापळ करू लागले आहेत.

सत्तेसाठी निष्ठेला अलविदा, पाहा महिनाभरातील कोलांटउड्या..

  • भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) निशिकांत पाटील कमळ सोडून घड्याळाच्या वाटेवर.
  • लोकसभेला विशाल पाटील यांचे पाकीट संजय पाटील यांच्याविरोधात फडकवणारे अजितराव घोरपडे आता संजय पाटील यांच्या दिशेने
  • गेली पाच वर्षे स्वत:ला काँग्रेसचा निष्ठावान पाईक म्हणविणारे मिरजेचे विज्ञान माने वंचितच्या आश्रयाला.
  • गेल्या १५ वर्षांपासून मिरजेत कमळाला पाणी घालणारे प्रा. मोहन वनखंडेंचा आता काँग्रेसच्या हातात हात.
  • घड्याळाच्या टिकटिकवर राजकारणाची वेळ साधू पाहणारे विट्याचे वैभव पाटील तुतारी उंचावण्याच्या तयारीत.
  • लोकसभेला काँग्रेस बंडखोरासाठी भाजपला ठेंगा दाखविणारे जतचे विलासराव जगताप आता गोपीचंद पडळकर नकोत म्हणून पुन्हा भाजपमध्येच संघर्षाच्या पवित्र्यात.
  • आटपाडीला गेले दशकभर भाजपसोबत भगवे झालेले राजेंद्रअण्णा देशमुख विधानसभेसाठी तुतारीच्या आवाजात आवाज मिसळणार.
  • लोकसभेला भाजपच्या लोकांनी घात केल्याचा आरोप करणारे माजी खासदार संजय पाटील मुलगा प्रभाकरसाठी घड्याळ बांधण्याच्या विचारात.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीPoliticsराजकारण