शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

आरेवाडीचे गजनृत्य आता बेंगलोरमध्ये

By admin | Updated: March 6, 2017 23:54 IST

राष्ट्रीय महोत्सवात सहभाग : कालाकारांना मिळाला बहुमान; भारतीय लोकपरंपरेचे चित्र

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील धनगरी गजनृत्याला कर्नाटकमधील बेंगलोर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात सांस्कृतिक कार्यक्रमातही या गजनृत्याने सहभाग नोंदविला आहे. १९५८ मध्ये दिल्ली येथे हे गजनृत्य पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कौतुकास पात्र ठरले होते. २००१ मध्ये या कलाकारांनी इंग्लंड दौरा केला होता, तर २००९ मध्ये रशियातील मॉस्को शहरात सादरीकरण केले होते. २०१० मधील राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ४८ कलाकारांनी नृत्य सादर करुन संपूर्ण जगभर ही कला पोहोचवली होती. दिल्ली, पणजी, पुणे, नागपूर, मुंबई ते कन्याकुमारीपर्यंत असा या कलेचा प्रसार झाला आहे. (प्रतिनिधी)कलेचे जतनधनगरी गजनृत्याचे अभ्यासक दाजी कोळेकर म्हणाले की, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या गजनृत्याला कॅम्पेन नृत्य असेही म्हणतात. कैलासपती भगवान शंकराचा अवतार असलेल्या बिरोबा देवाच्या आराधनेतून या नृत्याची निर्मिती झाली आहे. पूर्वी डोंगर, दऱ्यामध्ये रानावनात मेंढपाळ म्हणून व्यवसाय करणारे धनगर समाजबांधव रात्री बिरोबाची आराधना करण्यासाठी हे नृत्य ढोलांच्या तालावर करत. गज म्हणजेच हत्तीसारखे डोलत केले जाणारे हे नृत्य गजनृत्य म्हणून ओळखले जाते. गजनृत्याचे अनेक प्रकार नामशेष झाले असले तरी, ४ ते १० प्रकार अद्याप कलाकारांनी जतन केले आहेत. प्रत्येक प्रकारामध्ये १५ ते २० उपप्रकार आहेत. असे कला सादर करणारे कलाकार ८ ते २० पर्यंत असतात.