शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तासगावातील तरुण व्यावसायिकाची सावकारी छळामुळे आत्महत्या

By संतोष भिसे | Updated: January 12, 2024 17:19 IST

दुचाकीसह टीव्ही काढून नेला, चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी, पत्नीने दिली फिर्याद, चौघांना अटक

सांगली : तासगाव येथील सचिन गौरीहर माळी (रा. माळी गल्ली) तरुण व्यावसायिकाने सावकारांच्या छळाला कंटाळून सांगलीत आत्महत्या केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील अनुराधा हॉटेलच्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. याप्रकरणी तासगावमधील चौघा खासगी सावकारांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सचिन यांची पत्नी सीमा यांनी पोलिसांत फिर्याद दिली. अमोल सुरेश बेले (रा. खानापूर वस्ती, तासगाव), योगेश संजय बेले (रा. डबास गल्ली, तासगाव), अमोल जगन्नाथ यादव (रा. माळी गल्ली, तासगाव) आणि गजानन घाडगे (रा. ढवळ वेस, तासगाव) अशी संशयित खासगी सावकारांची नावे आहेत.  पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

व्याजाने घेतलेल्या पैशांवर चौघा संशयितांनी चक्रवाढ पद्धतीने अवाजवी व्याज आकारणी केली. वसुलीसाठी सचिन यांचा शारीरिक व मानसिक छळ केला, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सीमा यांनी फिर्यादीत म्हटले आहे.  संशयितांनी सचिन यांच्याकडूच्मुद्दल व व्याजापोटी ४ लाख ७० हजार रुपये वसुल केले. घरातील ४० हजार रुपये किंमतीचा नवा टीव्ही संच काढून नेला. १ लाख १५ हजार रुपये किंमतीची दुचाकीही जबरदस्तीने ओढून नेली. हा छळ सहन न झाल्याने सचिन यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. मंगळवारी (दि. ९) रात्री सव्वाआठपूर्वी अनुराधा हॉटेलच्या खोली क्रमांक मध्ये गळफास घेतला. पोलिसांनी चौघा संशयितांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

सचिन माळी यांनी व्यावसायिक कारणासाठी काही महिन्यापूर्वी संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ठरल्याप्रमाणे सर्व रकमेची परतफेडही केली. त्यानंतरही त्यांनी आणखी पैशांसाठी तगादा लावला होता. चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करुन ४ लाख ७० हजार रुपयांची बेकायदा वसुली केली. 

टीव्ही, दुचाकी काढून नेलीअमोल बेले याने सचिन यांच्या घरात जबरदस्तीने घुसून टीव्ही काढून नेला. योगेश बेले याच्याकडून सचिन यांनी ४० हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात योगेशने सचिन यांची नवीकोरी दुचाकी (एमएच १० डीडी २२१८) जबरदस्तीने स्वत: च्या नावावर करुन घेतली. यानंतरही वसुलीचा तगादा थांबलेला नव्हता. सचिन यांना व्यवसायाच्या ठिकाणी वारंवार जाऊन शिवीगाळ, दमदाटी केली जात होती. जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. याला कंटाळून सचिन माळी यांनी आत्महत्या केल्याची सीमा यांची तक्रार आहे.