शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत लांबलचक कवड्या साप, पण त्याला रंगच नाही!!

By संतोष भिसे | Updated: August 10, 2023 16:58 IST

सांगली : बायपास रस्त्यावर आढळलेल्या अल्बिनो सापाची प्राणिमित्रांनी मुक्तता करुन सुरक्षित ठिकाणी सोडले. रंगविरहित त्वचेच्या प्राण्याला अल्बिनो म्हटले जाते.  ...

सांगली : बायपास रस्त्यावर आढळलेल्या अल्बिनो सापाची प्राणिमित्रांनी मुक्तता करुन सुरक्षित ठिकाणी सोडले. रंगविरहित त्वचेच्या प्राण्याला अल्बिनो म्हटले जाते. बायपास रस्त्यावर एका घरात पांढरा साप असल्याचा निरोप सर्पमित्र स्वप्नील यादव यांना मिळाला. परिसरातील दलदल आणि गवताळ मैदानातून तो घरात घुसला होता. रंग नसलेल्या सापाला पाहून संबंधित कुटुंबियदेखील चक्रावले. सुमारे चार फुट लाबींच्या या पांढऱ्या सापावर मध्येमध्ये पिवळे पट्टे होते. रहिवाशांनी सापाला न मारता सर्पमित्र यादव यांना कळविले. यादव यांनी सापाला पकडून इन्साफ फाऊंडेशनचे अध्यक्ष जावेद शेख यांना माहिती दिली.बिनविषारी कवड्या जातीच्या या सापामध्ये रंगद्रव्यांच्या कमतरतेमुळे त्वचेला रंग आला नव्हता. सापाच्या अंड्यांना पुरेशी उब मिळाली नाही, तर रंगद्रव्यांचा अभाव निर्माण होतो. जन्मल्यानंतर त्यांच्या त्वचेचा मूळ रंग हळूहळू नष्ट होतो. पूर्ण पांढरा पडतो. त्याच्या वेगळ्या रंगामुळे शिकाऱ्यांचे भक्ष्य बनतो. स्वसंरक्षणासाठी ते आक्रमक होतात, चावा घेण्याचा प्रयत्न करतात. इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी या सापाला मानद वन्य जीवरक्षक अजित पाटील यांच्या ताब्यात दिले. पाटील यांनी निसर्गात मुक्त केले.

टॅग्स :Sangliसांगलीsnakeसाप