शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

विहीरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ४ हजार, आळतेच्या ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

By घनशाम नवाथे | Updated: June 19, 2025 21:33 IST

मुजावर याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सायंकाळी घर झडतीची घेण्यात आली. तसेच तासगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून विहिर खुदाईचा प्रस्ताव पाठवून तो पूर्ण करेपर्यंत मदत करण्यासाठी ४ हजार रूपयांची लाच घेताना आळते (ता. तासगाव) येथील ग्रामसेवक आलिम यासीन मुजावर (वय ३८, रा. तासगाव) याला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी ही कारवाई केली.

तक्रारदार हे आळते येथील शेतकरी आहेत. त्यांच्या वडिलांचे नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर आहे. विहीर खुदाई प्रकल्प प्रस्तावाचा प्राथमिक मागणी प्रस्ताव पाठविण्यासाठी तक्रारदार हे पाठपुरावा करत होते. तेव्हा प्रस्ताव पाठवून कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तसेच प्रस्तावाची पुढील मस्टर मागणीसाठी, प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करतो असे सांगून ग्रामसेवक मुजावर याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने दि. १९ रोजी ग्रामपंचायत कार्यालयसमोरील आवारात पडताळणी केली. तेव्हा ग्रामसेवक मुजावर याने ४ हजार रुपये लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ४ हजार रूपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष रक्कम स्विकारल्यानंतर मुजावर याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून लाचेची रक्कम ४ हजार रुपये, मोबाईल, इत्यादी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

मुजावर याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सायंकाळी घर झडतीची घेण्यात आली. तसेच तासगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. लाचखोर मुजावर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, रजपूत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

लाचखोरीची तालुक्यात चर्चागतवर्षी तासगाव तालुक्यात सात हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह तिघांना अटक केली होती. त्यानंतर तालुक्यात ग्रामसेवकाला लाच घेताना अटक केल्यानंतर महसूल विभागातील लाचखोरीची चर्चा सर्वत्र रंगली होती.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSangliसांगली