शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गदा फिरविण्याची अनोखी स्पर्धा, शुभम चव्हाणने पंधरा मिनिटात ७८३ वेळा फिरवली गदा

By अविनाश कोळी | Updated: April 1, 2023 13:20 IST

सांगली : पंधरा मिनिटात गतीने जास्ती जास्त वेळा गदा फिरविण्याची अनोखी स्पर्धा सांगलीत पार पडली. या स्पर्धेत सांगलीच्या शुभम ...

सांगली : पंधरा मिनिटात गतीने जास्ती जास्त वेळा गदा फिरविण्याची अनोखी स्पर्धा सांगलीत पार पडली. या स्पर्धेत सांगलीच्या शुभम चव्हाण याने ७८३ वेळा गदा फिरवून प्रथम क्रमांक पटकावला.रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी सांगलीच्या गणेशनगर येथील रोटरी हॉलमध्ये गदा फिरवण्याची स्पर्धा पार पडली. कुरुंदवाड, शिरोळ, सांगलीवाडी, सांगली येथून वीस स्पर्धकानी भाग घेतला होता. दहा किलोची गदा फिरविण्यासाठी पंधरा मिनिटांची वेळ देण्यात आली होती.

स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे अध्यक्ष सचिन कोले यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेचे नियोजन आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच रामकृष्ण चितळे, समर्थ व्यायाम शाळेचे वैभव माईणकर, सुहास व्हटकर यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण पुण्यातील व्यावसायिक शैलेंद्र जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.

स्पर्धेत शुभम विनायक चव्हाण याने ७८३ वेळा गदा फिरवून प्रथम, सांगलीच्या हरी सदानंद महाबळने ७४५ वेळा फिरवून द्वितीय, शिरोळच्या अनिकेत परशुराम चव्हाणने ७०७ वेळा फिरवून तृतीय, तर पै. सुहास विलास माने याने ६९६ वेळा फिरवून चौथा क्रमांक पटकाविला. कार्यक्रमास सनतकुमार आरवाडे, रविकिरण कुलकर्णी, डॉ. श्रीनिवास नाटेकर, मनीष मराठे, नितीन शहा, सलील लिमये, डॉ. सुहास जोशी, डॉ. दिलीप पटवर्धन, संजय रानडे, उदय पाटील, अजय शहा उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली