शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

सांगली जिल्ह्यातील 'या' गावात ऐतिहासिक शिवकालीन 'बारव'मध्ये दडलाय कलात्मक स्थापत्याचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 11:47 IST

नेवरी गावालगत दक्षिण दिशेला पुरातन बारव आहे. ही पुरातन बारव आणि तिची रचना पाहिली की या गावचं गतवैभव डोळ्यात भरतं.

प्रताप महाडीककडेगाव : ऐतिहासिक परंपरा लाभलेले गाव म्हणून कडेगाव तालुक्यातील नेवरी या गावाची ओळख आहे. येथील ऐतिहासिक शिवकालीन बारव या गावच्या  वैभवशाली इतिहासाची साक्ष देते. ही ऐतिहासिक 'बारव'  गावामधील महत्वाचा ऐतिहासिक वारसा असून कलात्मक  स्थापत्याचा आदर्श नमूना आहे. या बारवेची भव्यता व देखणेपणं नजरेत भरते यामुळे ही बारव सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे.नेवरी गावालगत दक्षिण दिशेला पुरातन बारव आहे. ही पुरातन बारव आणि तिची रचना पाहिली की या गावचं गतवैभव डोळ्यात भरतं. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार ही बारव व्यंकोजीराजे यांनी बांधली असे समजते. मात्र रचना पाहून ही बारव पुरातन काळातील असावी असेही काही लोक सांगतात.अजूनही वाडा संस्कृतीची घरेयेथे सुरेराव व भालेराव या महाडीक बंधूंच्या शौर्याचा इतिहासही लोक अभिमानाने सांगतात. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जावई हरजीराजे महाडीक यांचे बंधू व्यंकोजीराजे महाडीक यांचा ऐतिहासीक वारसा या गावाला लाभला आहे अशी माहिती मिळते. येथे अजूनही वाडा संस्कृतीची घरे पाहायला मिळतात. येथील मोठ-मोठे वाडे ,भक्कम तटबंदी, डौलाने उभी असणारी वेस, मंदीरे ह्या सर्व गोष्टी या  प्राचीन तसेच ऐतिहासिक काळाची साक्ष देतात.भद्रा प्रकारची बारवयेथील प्रमुख आकर्षण असलेली  बारव साधारण चौरसाकार असून या मध्ये उतरायला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही  बाजूने पाय-या बांधल्या आहेत. भद्रा प्रकारची ही बारव असून या बारवेच्या भिंतीमध्ये चारही दिशेला एकंदरीत मंदीरवजा १२ देवकोष्टके (देवळ्या) आहेत. यात देवी देवतांच्या मूर्ती होत्या. या मूर्ती सद्यस्थितीत दिसत नाहीत. वरील बाजूस पाणी खेचण्यासाठी मोट बसविण्यासाठी दगडी बांधकाम असून पाणी वाहून हौदात सोडण्यासाठी दगडी पन्हाळी बांधण्यात आल्या आहेत.

महादेवाच्या पिंडीवर सोनेरी किरणांचा अभिषेकबारवेलगत उंच चौथऱ्यावर महादेवाचे पूर्वाभिमुख पुरातन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदय झाला की पहिल्या सोनेरी किरणांचा अभिषेक गाभाऱ्यातल्या महादेवाच्या पिंडीवर  पडतो. नेवरी  गावठाण अजुनही जुन्या पध्दतीच्या घरांनी व्यापलेले असुन गावाने अजूनही खेडुतपणा जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या गावात नवीन विहीर व पाणी योजना आली असली तरी पूर्वीच्या काळात सर्व गावाची तहान बाराही महिने भागविणारी ही बारव मात्र आज आकर्षण ठरत आहे. ही बारव पूर्व पश्चिम  स्वरूपात पहावयास मिळते. ग्रामस्थांनी येथील बारवेचे संवर्धन अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे. यापुढेही दीर्घकाळ हा ठेवा जपण्याची गरज आहे.

पुरातत्व खात्याने लक्ष देण्याची गरज नेवरी येथील आकर्षक बारवेलगत दोन दगडी हौदाचे व एका हत्तीकुंडाचे आकर्षक  बांधकाम दिसते. यातील एका दगडी हौदाची पडझड झाली आहे. येथील बारव, दगडी हौद आणि हत्ती कुंड हा पुरातन व ऐतिहासिक  ठेवा जपण्यासाठी पुरातत्त्व खात्यानेही वेळीच लक्ष द्यावे.आणि या बारावचे संवर्धन करावे अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीhistoryइतिहास