शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गरीब पैलवानाला निवडणुकीत उभे करून फसविले- संजय पाटील

By अविनाश कोळी | Updated: May 15, 2024 20:29 IST

आघाडीतल्या माजी मंत्र्यांकडून पाकिटाचा प्रचार

सांगली: महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून एका गरीब पैलवानाला लोकसभा निवडणुकीत उभे केले. ऐनवेळी माजी मंत्री असलेल्या आघाडीच्याच एका आमदाराने पैलवानाऐवजी बंडखोर उमेदवाराचा छुपा प्रचार केला, असा आरोप भाजपचे खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले की, निवडणुकीत उमेदवाराला फसविण्याचा उद्योग जसा महाविकास आघाडीत झाला तसा तो भाजपमध्येही झाला. सांगली लोकसभा मतदारसंघात आमच्याच पक्षातील काही लोकांनी सोबत असल्याचे भासवून दगाफटका केला. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची कृती उजेडात आली आहे. पक्ष निश्चित त्यांच्यावर कारवाई करेल. मात्र, पक्षात ज्यांनी विश्वासघाताचे राजकारण केले त्यांच्याशी तशाच पद्धतीने वागण्याची माझी भूमिका राहणार आहे.

पक्षात काही लोकांनी विरोधात काम केल्यामुळे मताधिक्य घटणार, हे निश्चित आहे. पूर्वी अडीच लाखांच्या मताधिक्याचा दावा मी केला होता. आता लाखाचे मताधिक्य मिळेल, असे वाटते. तरीही विजयापासून मी दूर झालो नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांना सहानुभूती जरूर मिळाली; पण सहानुभूतीचे मतात कधी रूपांतर होत नसते, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले की, भाजपच्या माजी अध्यक्षांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्याची शहानिशा केली जात आहे. पक्षातील ज्या लोकांनी उमेदवाराच्या विरोधात काम केले असेल त्यांचा अहवाल प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात येईल. संबंधितांवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई होईल.

हिशेब व्याजासह चुकता करूभाजपमधील काही नेत्यांनी जे राजकारण माझ्यासोबत केले तसेच राजकारण यापुढे माझ्याकडूनही होईल. त्यांचा हिशेब व्याजासह चुकता केला जाईल, असा इशारा संजय पाटील यांनी दिला.‘माई का लाल’ पैदा झाला नाहीमाझी राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल, असा इशारा एका नेत्याने दिला होता; पण, माझी कारकिर्द संपविणारा ‘माई का लाल’ अद्याप पैदा झाला नाही. त्यामुळे नथीतून तीर मारणाऱ्या नेत्याने हे लक्षात ठेवावे. त्यांना निकालादिवशी योग्य उत्तर मिळेल.

अश्लील छायाचित्राबद्दल तक्रार करावी

विरोधी उमेदवाराची आणखी छायाचित्रे आमच्याकडे होती. आमच्या लोकांनी छायाचित्रे व्हायरल केली म्हणून त्यांनी जरूर तक्रार करावी. त्यांनी निवडणुकीत बरेच रंग दाखविले आहेत. त्याचा फायदा त्यांना झाला नाही, असे संजय पाटील म्हणाले.

रोख जयंतरावांकडे की विश्वजित कदम यांच्याकडे?चंद्रहार पाटील यांना फसविल्याची टीका करताना संजय पाटील यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. रोख जयंत पाटील यांच्याकडे आहे की, विश्वजित कदम यांच्याकडे याचेही उत्तर त्यांनी दिले नाही.

कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा

लोकसभेच्या राजकारणाविषयी संजय पाटील म्हणाले की, कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू केव्हाही चांगला. ज्यांनी ज्या पद्धतीने माझ्याशी राजकारण केले त्यांच्याशी तसेच राजकारण केले जाईल.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sangliसांगली