शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार नाेंदविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना लाच देणारच जाळ्यात, उपाळे मायणीतील एकास अटक

By हणमंत पाटील | Updated: December 13, 2023 13:06 IST

Sangli News: कडेगाव पोलिस ठाण्यात भावाविरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यास लाच देताना उपाळे मायणी (ता. कडेगाव) येथील एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

- हणमंत पाटील/प्रताप महाडिक  कडेगाव -  कडेगाव पोलिस ठाण्यात भावाविरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यास लाच देताना उपाळे मायणी (ता. कडेगाव) येथील एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मंगळवारी (१२ डिसेंबर) रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. अभिजित नारायण गोरड (वय ३६, रा. उपाळे-मायणी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका अधिकाऱ्याने तक्रार दिली हाेती.

तक्रारदार हे कडेगाव पोलिस ठाण्यात अधिकारी आहेत. उपाळे मायणी येथील अभिजित गोरड यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात त्यांच्या भावाविरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यास लाच घेण्याबाबत आग्रह केला. यावर संबंधित पोलिस अधिकाऱ्याने ८ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता अभिजित गोरड याने तक्रारदार अधिकाऱ्यास ५००० रुपये लाच घेण्याचा आग्रह केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मंगळवारी कडेगाव पाेलिस ठाण्यात सापळा लावण्यात आला. यावेळी अभिजित गोरड याला तक्रारदार अधिकाऱ्यास ५००० रुपये लाच देत असताना रंगेहात पकडण्यात आले. अभिजित गोरड याच्याविरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.

उपआयुक्त व पोलिस अधीक्षक अमोल तांबे, पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार सलिम मकानदार, चंद्रकांत जाधव, प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, चालक वंटमुरे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSangliसांगली