शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमावास्येला जिवंत बोकड झाडाला उलटे टांगले; कवलापूर येथे बळी देण्याचा अघोरी प्रकार

By घनशाम नवाथे | Updated: April 14, 2024 17:49 IST

कवलापूर ते तासगाव रस्त्यावर रस्त्यापासून पन्नास फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचे अंदाजे दहा किलो वजनाच्या बोकडाचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्यांना उलटे टांगून ठेवले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे तासगाव रस्त्याकडेच्या एका लिंबाच्या झाडाला दर्श सोमवती अमावास्येच्या दिवशी कोणीतरी अंधश्रद्धेतून जिवंत बोकड आणून मागील दोन पाय दोरीने बांधून झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते. आठवडाभर बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे तडफडून त्यांचा मृत्यू झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हा प्रकार कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अंनिसने सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवला. या अघोरी बळीची गावात चर्चा रंगली आहे.

कवलापूर ते तासगाव रस्त्यावर रस्त्यापासून पन्नास फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचे अंदाजे दहा किलो वजनाच्या बोकडाचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्यांना उलटे टांगून ठेवले होते. अमावास्येला रात्री बांधलेले बोकड आठवडाभर तसेच राहिल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंनिसला हा प्रकार कळवला. तातडीने अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, फारुख गवंडी यांनी पाहणी केली.

हा सर्व प्रकार अमावास्येच्या रात्री ज्याप्रकारे केला आहे, यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, पाडव्याच्या आदल्या दिवशी अमावास्येच्या रात्री एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती. त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.झाडाला जिवंत बोकड उलटे टांगून बळी देण्याचा अघोरी प्रकार पहिल्यांदाच पाहात असल्याचे अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी यांनी यावेळी सांगितले. मांत्रिकाच्या किंवा देवरुर्षीच्या सल्ल्यानुसार कोणी तरी अमावास्येच्या दिवशी हा प्रकार केला असावा, असे वाटते. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यास हा प्रकार कळवण्यात आला.

जिवंत बोकडाचा अघोरी बळी देणे, ही अत्यंत अमानवी, अघोरी प्रथा आहे. संबंधितांचा शोध घेऊन जादूटोणाविरोधी कायद्यानुसार आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी थोरात, गवंडी, डॉ. निटवे यांनी केली आहे. तसेच याबाबत कोणाला माहिती असल्यास पोलिसांशी किंवा अंनिसशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

परिसरात दुसऱ्यांदा प्रकारयापूर्वीही कवलापूर येथील रसूलवाडी रस्त्यावरही अशा प्रकारे झाडाला बोकड उलटे टांगून अघोरी प्रकाराने बळी देण्याचा प्रकार घडल्याची माहिती नागरिकांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी