शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सांगलीत पोलिसांनी पकडलेला सव्वा कोटींचा गांजा जाळून नष्ट; ४५ गुन्ह्यात केला होता जप्त 

By शरद जाधव | Updated: August 5, 2023 20:28 IST

सांगली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी कारवाई करत पकडलेला तब्बल एक कोटी २० लाख रुपये किंमतीचा गांजा जाळून नष्ट करण्यात आला.

सांगली : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी कारवाई करत पकडलेला तब्बल एक कोटी २० लाख रुपये किंमतीचा गांजा जाळून नष्ट करण्यात आला. भिलवडी येथे वुड फायर बॉयलरमध्ये दिवसभरात हा गांजा नाश करण्यात आला. जिल्ह्यातील ११ पोलिस ठाण्यांकडे दाखल गुन्ह्यातील लागवड, वाहतूक, विक्री आणि सेवन करताना जप्त करण्यात आलेला गांजा अंमली पदार्थ गोदामात ठेवण्यात आला होता. १९९८ पासून २०२२ पर्यंतचा हा माल होता. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गोदामात असलेला गांजा नष्ट करण्यासाठी न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करून याबाबतचा आदेश मिळविला होता. त्यानुसार ११ पोलिस ठाण्याकडील ४५ गुन्ह्यातील गांजा नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत भिलवडी येथील चितळे उद्योग समूहाच्या वुड फायर बॉयलरमध्ये हा गांजा नाश करण्यात आला. ही प्रक्रिया सुरू असताना प्रदुषण होणार नाही व आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही याबाबत सर्व दक्षता घेण्यात आली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रासायनिक विश्लेषकांचे पथक, वैध मापन विभागाचे कर्मचारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. चितळे उद्योग समूहाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही याकामी सहकार्य केले.पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक तुषार पाटील, अरविंद बोडके, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, रासायनिक विश्लेषक वर्षा पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

 बाराशे किलो गांजानाश केलेला गांजा हा जिल्ह्यातील जत, उमदी, मिरज शहर पोलिस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे मिरज, सांगली ग्रामीण, विटा, कासेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज ग्रामीण भागातील १२०५ किलो गांजाचा समावेश आहे.

टॅग्स :Sangliसांगली