शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

..अन् त्याने चालविली मोटारसायकल, सांगलीतील १३८ दिव्यांग झाले सक्षम 

By अविनाश कोळी | Updated: June 17, 2024 16:20 IST

पुण्यातील विकलांग पुनर्वसन केंद्राचा सांगलीत उपक्रम

सांगली : दिव्यांग व्यक्तींना सक्षम व स्वावलंबी बनविण्याचे काम अत्याधुनिक मॉड्युलर हात व पायांनी सुरू केले आहे. याच साधनांनी सांगलीतील १३८ दिव्यांगांना सक्षमतेचे वरदान दिले. आजवर दुसऱ्याच्या आधाराने जीवन जगणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीने मॉड्युलर हात बसविल्यानंतर मोटारसायकल चालवून दाखविली अन् दिव्यांग, तसेच उपक्रम राबविणारे आयोजक भारावून गेले.लाकडी हात किंवा जयपूर फूटमुळे काही प्रमाणात दिव्यांगांना आधार मिळत होता. मात्र, सामान्यपणे हालचाली करणे त्यांना शक्य होत नव्हते. अशा हालचाली करता येण्यासाठीच मॉड्युलर अवयवांचा जन्म झाला. मात्र, ते महागडे असल्याने सामान्य दिव्यांगांना ते खरेदी करणे शक्य नसते. याच गोष्टी जाणून दिव्यांगांसाठी गेली पंचवीस वर्षे कार्यरत असलेल्या पुणे येथील विकलांग पुनर्वसन केंद्राने यासाठी एक उपक्रम हाती घेतला.संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सांगली येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये भारत विकास परिषद, सांगली आणि कोथरुड-पुणे या शाखांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मॉड्युलर हात व पायांचे मोफत वाटप करण्यात आले. शिबिरात १३८ दिव्यांग व्यक्तींना अत्याधुनिक मॉड्युलर पाय व हात बसविण्यात आले. कृत्रिम अवयव प्रदान सोहळा चितळे ग्रुपचे संचालक गिरीश चितळे आणि जुबिली उद्योग समूहाचे संचालक राजेंद्र घोडावत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या विशेष उपक्रमाला सिरम इन्स्टिट्युट होराॅयझन, कोटीभास्कर ग्रुप, चितळे उद्योग समूह, जुबिली इंडस्ट्रीज, खरे क्लब आणि पु.ना. गाडगीळ या उद्योजक संस्थांनी सीएसआर निधीतून साहाय्य दिले.

शिबिरातून केली निवडसंयोजक संस्थांनी चार महिन्यांपूर्वी दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये २०० रुग्णांवर तपासणी करून १३८ जणांना रविवारी अवयव प्रदान करण्यात आले.

आजवर अशा कृत्रिम अवयवाद्वारे दोन हजार विकलांगांना दिव्यांग मुक्तीचा अनुभव मिळवून दिला आहे. त्यांना नवे जीवन लाभले याचे समाधान वाटते. - विनय खटावकर, प्रमुख, विकलांग पुनर्वसन केंद्र.

टॅग्स :Sangliसांगली