शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत क्रूरतेचा कळस; पाठीत अडकलेल्या कुऱ्हाडीसह रक्तबंबाळ वळू गावभर फिरला

By संतोष भिसे | Updated: July 16, 2024 18:17 IST

बेशुद्ध करुन कुऱ्हाड काढली

सांगली : माधवनगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून फिरणाऱ्या एका वळूवर कोणीतही कुऱ्हाडीचे वार केले. घाव बसताच वळू उधळला. पण वार खोलवर झाल्याने कुऱ्हाड त्याच्या शेपटीजवळ पाठीतच रुतून बसली. अडकलेली कुऱ्हाड आणि सांडणारे रक्त यासह तो गावभर फिरत होता. अखेर प्राणीप्रेमींनी त्याला बेशुद्ध करुन कुऱ्हाड काढली.मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या क्रुर हल्ल्याचा प्राणीप्रेमींनी निषेध केला. संबंधितावर कारवाईसाठी संजयनगर पोलिस ठाणे गाठले. माधवनगर परिसरात हा वळू जखमी अवस्थेत फिरत असल्याची माहिती नागरिकांनी प्राणीमित्रांना दिली. बराच रक्तस्त्राव झाल्याने तो अशक्त झाला होता. ॲनिमल रेस्क्यू पथक आणि ॲनिमल राहतच्या सदस्यांनी त्याच्यावर उपचारासाठी पावले उचलली. कुऱ्हाड खोलवर जाऊन अडकल्याने ती काढणे मुश्किल होते. त्यासाठी वळूला बेशुद्ध करणे गरजेचे होते. ॲनिमल राहतच्या पशुवैद्यांनी त्याला भूल दिली. तो बेशुद्ध झाल्यानंतर कुऱ्हाड बाहेर काढली.कुऱ्हाड काढत असतानाही बराच रक्तस्त्राव होत होता, तो वेळीच थांबविल्याने वळूचे प्राण वाचू शकले. पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहे. हल्लेखोरावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्राणीमित्रांनी पोलिसांकडे केली.

टॅग्स :Sangliसांगली