शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९२९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी वाढ झाली. दिवसभरात नवे ९२९ रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील २२ व परजिल्ह्यातील ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी वाढ झाली. दिवसभरात नवे ९२९ रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील २२ व परजिल्ह्यातील ३ अशा २५ जणांचा मृत्यू झाला. ९२७ जणांनी कोरोनावर मात केली, तर उपचाराखालील १०२१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ - उतार होत आहे. सोमवारी आठशे रुग्ण आढळले होते. त्यात मंगळवारी १२९ने वाढ झाली. वाळवा तालुक्यात सर्वाधिक २६४ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात २६, जत २३, कडेगाव ५०, कवठेमहांकाळ २७, खानापूर ३४, मिरज १००, पलूस ८६, शिराळा ६५, तासगाव ४८, तर महापालिका क्षेत्रात सांगलीत १५३, मिरजेत ५३ असे २०६ रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, कर्नाटकातील २६ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.

दिवसभरात जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला. त्यात कडेगाव, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी २, खानापूर १, मिरज ४, शिराळा ३, वाळवा तालुक्यातील ७, तर महापालिका क्षेत्रात मिरजेतील दोन व कुपवाडमधील एक अशा तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील कोल्हापूर जिल्ह्यातील २ व सोलापूर येथील एक अशा तीन जणांचाही कोरोनाने बळी घेतला.

सध्या १०२१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर जिल्ह्यातील ९२७ व जिल्ह्याबाहेरील १० रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या २,४२४ चाचण्यात २८७ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ८,००९ चाचण्यात ६६८ रुग्ण सापडले.

चौकट

आतापर्यंतचे बाधित : १,३७,८८८

कोरोनामुक्त झालेले : १,२५,५४०

आतापर्यंतचे मृत्यू : ३,९३१

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

सांगली : १५३

मिरज : ५३

आटपाडी : २६

जत : २३

कडेगाव : ५०

कवठेमहांकाळ : २७

खानापूर : ३४

मिरज : १००

पलूस : ८६

शिराळा : ६५

तासगाव : ४८

वाळवा : २६४