शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

९२ कुपोषित बालके डॉक्टरांकडून दत्तक : अभिजित राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:36 IST

जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या एक लाख ३९ हजार ६३९ बालकांपैकी ९२ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळले. याशिवाय ८३२ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्यातील ९२ कुपोषित बालकांना साधारण श्रेणीत

ठळक मुद्देसाधारण श्रेणीत आणण्यासाठी विशेष मोहीम राबविणार

सांगली : जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या एक लाख ३९ हजार ६३९ बालकांपैकी ९२ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळले. याशिवाय ८३२ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्यातील ९२ कुपोषित बालकांना साधारण श्रेणीत आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दत्तक घेणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, एकात्मिक बाल विकास विभागामार्फत दर महिन्याला शून्य ते ६ वयोगटातील बालकांच्या वजनाची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील एक लाख ३९ हजार ६३९ बालकांची वजने घेतली होती. यामध्ये तीव्र कुपोषित ९२ बालके आढळून आली आहेत.

कुपोषित बालकांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून दिवसातून आठवेळा आहार दिला जात आहे. परंतु बालकांमध्ये सुधारणा झालेली नसल्याचे आढळून आले. ९२ कुपोषित बालक साधारण श्रेणीत येण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीच बालकांना दत्तक घेणार आहेत. त्या बालकांच्या आहारापासून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कुपोषणाच्या उंबरठ्यावर असलेल्या बालकांचीही संख्या ऊस पट्ट्यातच सर्वाधिक आहे. कमी वजनाच्या चार हजार ४४ आणि तीव्र कमी वजनाच्या ५०१ बालकांचा समावेश आहे. या बालकांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज असून, वेळेवर पोषक आहार देण्याची गरज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकार राऊत यांनी सांगितले.सधन तालुक्यांमध्ये स्थिती गंभीरअभिजित राऊत म्हणाले, वाळवा तालुक्यामध्ये २६, पलूस व खानापूर तालुक्यात प्रत्येकी १२, मिरज तालुक्यात आठ तीव्र कुपोषित बालकांची संख्या आहे. आकडेवारी पाहता, सधन तालुक्यातच कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे. यावरून येथील पालकांचे बालकांच्या आहाराकडे फारसे गांभीर्याने लक्ष असल्याचे दिसत नाही, असे जिल्हा परिषद प्रशासनाचे मत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टर