शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन नगरपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 19:07 IST

आता १९ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानाची आकडेवारी जाहीर होताच तिन्ही नगरपंचायत कार्यक्षेत्रात निकालावरुन पैजा लावण्यात येत आहेत

सांगली : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या खानापूर, कडेगाव व कवठेमहांकाळ नगरपंचायतींसाठी मंगळवारी चुरशीने एकूण सरासरी ८२ टक्के मतदान झाले. तिन्ही नगरपंचायतींच्या एकूण १२५ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. आता १९ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तिन्ही नगरपंचायतीसाठी सकाळपासून मतदारांत उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंतच तिन्ही नगरपंचायतीसाठी ६५ ते ७० टक्के मतदान झाले होते. काही केंद्रांवर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, तर दुपारनंतर अनेक केंद्रे ओस पडली होती. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खानापूरसाठी सर्वाधिक ८५.५२ टक्के मतदान झाले असून कवठेमहांकाळसाठी ८२ तर कडेगावला ७९.९३ टक्के मतदान झाले.तिन्ही नगरपंचायतींत एकूण १२५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकी १३ जागांसाठी निवडणूक झाली असून प्रत्येक ठिकाणी उमेदवारांची गर्दी आहे. राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व शिवसेना या चारही पक्षांनी निवडणुकीसाठी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे निवडणुकीत चूरस निर्माण झाली आहे.मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा १९ रोजी होणाऱ्या निकालाकडे लागली आहे. जानेवारीतच उर्वरीत प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर एकत्रित मतमोजणी केली जाणार आहे.या नेत्यांची प्रतिष्ठा पणालाराष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे नेते कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, शिवसेनेचे आ. अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील, त्यांचे पुत्र रोहित पाटील, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख आदी दिग्ग्ज नेत्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.गावांमध्ये पैजा रंगल्यामतदानाची आकडेवारी जाहीर होताच तिन्ही नगरपंचायत कार्यक्षेत्रात निकालावरुन पैजा लावण्यात येत आहेत. आतापासूनच राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांत निकालाबाबत उत्सुकता दिसून येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकVotingमतदान