शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

७ कोरोना रुग्णांसाठी ८०० कर्मचारी! मिरज कोविड रुग्णालयातील चित्र; संपूर्ण रुग्णालय वेठीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:21 IST

कोरोनाची तिसरी लाट सुरू होताच, रुग्णालय फक्त कोरोनाबाधितांसाठी राखीव करण्यात आले. तिसऱ्या लाटेत जिल्ह्याची रुग्णसंख्या साडेपाच हजारांवर गेली; पण त्यातील ५००० रुग्ण घरगुती विलगीकरणातच राहिले.

- संतोष भिसेलोकमत न्यूज नेटवर्क  सांगली : मिरज कोविड रुग्णालयात अवघ्या सात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी तब्बल ८०० कर्मचारी गुंतून पडले आहेत. म्हणजे एका रुग्णासाठी ११५ कर्मचारी काम करीत आहेत. सध्या फक्त कोरोनाग्रस्तांसाठीच रुग्णालय खुले असल्याने ही अवस्था उद्भवली आहे. रुग्णालय अन्य रुग्णांसाठीही तातडीने खुले करण्याची मागणी होत आहे.

कोरोनाची तिसरी लाट सुरू होताच, रुग्णालय फक्त कोरोनाबाधितांसाठी राखीव करण्यात आले. तिसऱ्या लाटेत जिल्ह्याची रुग्णसंख्या साडेपाच हजारांवर गेली; पण त्यातील ५००० रुग्ण घरगुती विलगीकरणातच राहिले. शासकीय रुग्णालयात फक्त ४५० आणि खासगी रुग्णालयात ५० रुग्ण दाखल झाले. सध्या तर रुग्णालयात फक्त सातच रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सेवेसाठी ११० डॉक्टर्स, ६०० हून अधिक परिचारिका आणि ९० अन्य कर्मचारी तीन पाळ्यांत काम करीत आहेत.

रुग्णालयाचा सोनोग्राफी, सीटी स्कॅन व एमआरआय विभागही यातच गुंतून पडला आहे. तीनही शस्त्रक्रियागृहे काम नसल्याने बंद ठेवावी लागली आहेत. सांगोला, कवठेमहांकाळपासून येणारे सर्व रुग्ण सांगलीला पाठविले जात आहेत. प्रसूतीसाठी गर्भवतींना सांगलीला पाठविले जात आहे. यामुळे सांगलीतील शासकीय रुग्णालयावर प्रचंड ताण आहे.

कौलग्याच्या रुग्णाची ससेहोलपटकौलगे (ता. तासगाव) येथील एक रुग्ण दोन दिवसांपूर्वी मिरज रुग्णालयात आला होता. तेथे फक्त कोरोना रुग्णावर उपचार होत असल्याने सांगलीला पाठविण्यात आले. सांगलीत आल्यानंतर सीटी स्कॅन करण्यासाठी पुन्हा मिरजेला पाठविले. तेथून परत सांगलीला आला. यामध्ये संपूर्ण दिवस गेला. प्रचंड ससेहोलपट झाली.

भविष्यात चौथी लाट आलीच तर त्यांच्यासाठी मिरज कोविड रुग्णालयात स्वतंत्र विभाग व यंत्रणा तयार करावी, जेणेकरून संपूर्ण रुग्णालय वेठीस धरले जाणार नाही. पाच-दहा रुग्णांसाठी महिन्याला काही कोटींचा खर्च करणे योग्य नाही.  - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच

मिरजेचे रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करण्याचा विचार सुरू आहे. याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांतच होईल. कोरोना रुग्ण थोडेच असले, तरी त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करणे तूर्त शक्य नाही.  - डॉ. सुधीर नणंदकर, अधिष्ठाता, मिरज शासकीय रुग्णालय 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या