शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

सांगलीत आठशे गणेशमूर्ती दान, गणेशभक्तांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘डॉल्फिन’, ‘रोटरी’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 21:18 IST

जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जन करु नये, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप व रोटरी क्लब कृष्ण व्हॅली यांच्या प्रबोधनाला चांगले यश आले आहे. सातव्यादिवशी तब्बल आठशे गणेशमूर्ती त्यांच्याकडे दान झाल्या आहेत. तब्बल सात टन निर्माल्य संकलन झाले आहे. मूर्ती दानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

सांगली, दि. 31 - जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जन करु नये, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप व रोटरी क्लब कृष्ण व्हॅली यांच्या प्रबोधनाला चांगले यश आले आहे. सातव्यादिवशी तब्बल आठशे गणेशमूर्ती त्यांच्याकडे दान झाल्या आहेत. तब्बल सात टन निर्माल्य संकलन झाले आहे. मूर्ती दानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. डॉल्फिन नेचर ग्रुप व रोटरी क्लब कृष्ण व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्ती दान हा उपक्रम पाचव्यादिवशीही राबविण्यात आला होता. गणेशभक्तांमधून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत शंभर मूर्ती दान झाल्या होत्या. गुरुवारी उपक्रम आणखी चांगल्याप्रकार राबविण्यात आला. दोन्ही संस्थाचे पदाधिकारी मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जन करुन जलप्रदूषण करु नका, असे आवाहन करीत होते. ‘मूर्ती दान’ व ‘निर्माल्य संकलन’ असे फलक लाऊन उभा होते. कार्यकर्ते पर्यावरण व जलप्रदूषणाबाबत गणेशभक्तांचे प्रबोधन करीत होते. त्यामुळे गणेश भक्तांनीही या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पाचशे मूर्ती दान झाल्या. नेमीनाथनगर येथे महापालिकेने विसर्जनासाठी कुंड ठेवले होते. याठिकाणीही शंभर मूर्ती दान झाल्या. डॉल्फिनचे प्रा. शशिकांत ऐनापूरे म्हणाले, कुपवाड येथील कापसे प्लॉटमधील गणेश मूर्तीकाराशी संपर्क साधून दान झालेल्या मूर्ती त्यांच्याकडे ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जा भक्तांनी मूर्ती दान केल्या, त्यांना पुढील वर्षी पाहिजे असतील तर त्यांना देण्याची सोय केली आहे. मूर्तीला संबंधित भक्ताच्या नावाचे लेबल लावले आहे. ज्यांना मूर्ती नको आहेत, त्या मूर्र्तींना पुन्हा नव्याने रंग लाऊन कमी-जास्त दराने विक्री केली जाणार आहे. नवव्यादिवशीही हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रा. शाशिकांत ऐनापूरे यांची ‘टीम’ दुपारी चारपासून नदीकाढी हातात ‘निर्माल्य येथे द्या’, असे फलक घेऊन उभा होते. कार्याध्यक्ष अरुण कांबळे, सचिव डॉ. पद्मजा पाटील, राहूल साळुंखे, वैभव सोळस्कर, दिनेश पाटील, अर्चना ऐनापूरे, सचिन चोपडे, लक्ष्मण भट, विकास सावंत, अविष्कार माळी, विकास आवळे, नित्या पाटील, आदिती कुंभोजकर, ओमकार पाटील, असीफ मुजावर, पवण भोकरे, उज्वल साठे सहभागी झाले होते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव