शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील ७७ टॉवर घरपट्टीतून सुटले

By admin | Updated: October 16, 2015 00:54 IST

महापालिकेचा कारभार : लाखो रुपयांच्या उत्पन्नावर सोडले पाणी

सांगली : शहरातील १०९ पैकी केवळ ३२ मोबाईल टॉवरलाच घरपट्टी लागू करण्यात आली आहे. उर्वरित ७७ टॉवरला कराची आकारणी केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले असून, मोबाईल टॉवरवरील कारवाईही थंडावली आहे. सांगली शहरातील प्रभाग एकमध्ये ५२, प्रभाग दोनमध्ये ५७, कुपवाडमध्ये ६०, मिरजेत ४३ टॉवरची नगररचना विभागाकडे नोंद आहे. सांगली शहरात एकूण १०९ टॉवर आहेत. पण त्यापैकी केवळ ३२ टॉवरचीच घरपट्टी विभागाकडे नोंद आहे. महापालिकेच्याच दोन विभागातील टॉवरच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. केवळ ३२ टॉवरचाच कर वसूल केला जातो. त्यांच्याकडेही २३ लाख रुपयांची थकबाकी आहे. मध्यंतरी मोबाईल टॉवरवर थकबाकीपोटी कारवाई सुरू करण्यात आली होती; पण आता ही कारवाईही बसनात गेली आहे. मोबाईल कंपन्या कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवित असताना महापालिका मात्र हक्काच्या उत्पन्नापासून वंचित आहे. याचे प्रशासनाला गांभीर्य दिसून येत नाही. केवळ कागदोपत्री कारवाईचा बडगा उगारला जातो. (प्रतिनिधी)महापालिका हद्दीतील मोबाईल टॉवरची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. नगररचना व घरपट्टी विभागातील आकडेवारीत तफावत आहे. आता प्रभागातील स्वच्छता निरीक्षक व नगरसेवकांची एकत्र बैठक घेऊन त्या त्या प्रभागातील मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करणार आहोत. त्यानंतर टॉवरवर कराची आकारणी करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करू, असे स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी सांगितले.