शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील ७५,३७१ विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत-साडेचार कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:43 IST

शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या हलगर्जीपणामुळे पैसेच वर्ग नाहीत; पहिल्या दिवशीच गणवेश देण्याचा उपक्रम नियोजनात फसला

अशोक डोंबाळे।सांगली : शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शासनाकडून गणवेशासाठी ४ कोटी ५२ लाखांचा निधी मिळूनही तो जिल्हा परिषदेकडून शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग झालेला नाही.

शासनाच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येते. पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील आणि दारिद्र्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशासाठी लागणारा निधी देण्यात येतो. गतवर्षी हा निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता;

मात्र यावर्षी शाळेच्या पहिल्यादिवशी म्हणजे दि. १५ जूनला मुलांना गणवेशाचा निधी मिळालाच नाही. यावर्षी शिक्षण विभागाने गणवेशाचा निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या संयुक्त बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला. मात्र शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही तो निधी वर्ग झालेला नाही.जिल्ह्यातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही रक्कम गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर संबंधित शाळांच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये चौकशी केल्यानंतर, विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याचे समजले आहे.

याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी, शासनाकडून निधी आला असून, तो गटशिक्षणाधिकाºयांच्या खात्यावर चार दिवसांत जमा करणार असल्याचे सांगितले.शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि गणवेश देण्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात महिन्याचा कालावधी होऊनही गणवेश मिळालेले नाहीत.ओळखीच्या दुकानदारांचा शोधएका विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जात होते. यासाठी पूर्वी प्रत्येक गणवेशामागे दोनशेप्रमाणे ४०० रुपये मिळत होते. त्यात १०० रुपयांची वाढ करुन ३०० रुपये, म्हणजे एका विद्यार्थ्याला ६०० रुपये अनुदान दिले जात आहे. कमी किमतीत गणवेश कसे बसतील, यासाठी ओळखीचा कापड दुकानदार शोधण्यात मुख्याध्यापक, शिक्षकांची ताकद खर्ची पडणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzp schoolजिल्हा परिषद शाळा