शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा वीज ग्राहकांना दरवाढीचा दुहेरी झटका; सुरक्षा ठेवीसोबत इंधन अधिभाराचा बोजा

By संतोष भिसे | Updated: May 20, 2024 17:50 IST

देशात सर्वाधिक दर

विटा : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीज दरवाढ मंजुरीनुसार दि. १ एप्रिल २०२४ पासून वीजदरात सरासरी ७ ते ८ टक्के वाढ झाली आहे. त्यामध्ये पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेव आणि वाढीव इंधन अधिभाराचा बडगा उगारला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज दरवाढीचा दुहेरी झटका बसला आहे. ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त हाेत आहे.महावितरणने एप्रिल २०२४ च्या वीज बिलात प्रतियुनिट १५ पैशांपासून एक रूपयापर्यंत वाढीव इंधन अधिभाराची आकारणी केली आहे. त्याद्वारे छुपी दरवाढ लादली आहे. पूर्वी सरासरी वीज वापराच्या एक महिन्याच्या रकमेइतकी सुरक्षा ठेव बंधनकारक होती. २०२२ पासून नियामक आयोगाने ही ठेव दोन महिन्यांच्या बिलाइतकी घेण्यास महावितरणला परवानगी दिली. त्यानुसार मार्चअखेरीस प्रत्येक ग्राहकाच्या वार्षिक वीज वापराचे अवलोकन केले जाणार आहे. वाढीव वापरानुसार कमी पडणारी रक्कम अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून स्वतंत्र बिलाद्वारे एप्रिलपासून मागणी केली जात आहे.राज्यातील सामान्य वीज ग्राहकांचा विचार करता ९९ टक्के ग्राहक वेळेवर बील भरणा करतात. केवळ एक टक्का अप्रामाणिक व मुदतीत बील न भरणाऱ्या ग्राहकांसाठी ९९ टक्के ग्राहकांना वेठीस धरून अन्याय केला जात आहे.

देशात सर्वाधिक दरराज्यातील सामान्य वीज ग्राहकांबरोबरच व्यापारी, औद्योगिक ग्राहकांचे वीज दर देशात सर्वाधिक झाले आहेत. एकाच वेळ दरवाढ, इंधन अधिभाराची आकारणी व अतिरिक्त सुरक्षा ठेवीमुळे थेट १५ टक्के वीज दरवाढ लादली गेली आहे. शासनाने यात तातडीने लक्ष घालून विजेचे दर कमी करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे सदस्य किरण तारळेकर यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरण