शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात ६९%मतदान

By admin | Updated: February 22, 2017 00:05 IST

८२४ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद : उन्हाच्या झळा सोसतच मतदारांनी बजावला हक्क

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी सातारा जिल्ह्यात सरासरी ६८.६६ टक्के मतदान झाले. १९ लाख ६६ हजार १३ पैकी १३ लाख ४९ हजार ८८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मशीन बदलाव्या लागल्या. तुरळक आक्षेपाच्या घटना वगळता मतदान शांततेच्या वातावरणात पार पडले. जिल्हा परिषदेच्या ६४ व पंचायत समितीच्या १२८ अशा एकूण १९२ जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीनपर्यंत खंडाळ्यात ६१.४४ टक्के व कऱ्हाड तालुक्यात ६१.७७ टक्के मतदान झाले होते. या दोन तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले असून खंडाळा तालुक्यात ७५.३८, तर कऱ्हाड तालुक्यात ६३.२१ टक्के इतके मतदान झाले. खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे मतदानासाठी आलेल्या ठकुबाई एकनाथ नेवसे (वय ८३) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मतदान केंद्रावर आल्या असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना नायगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिरजे, ता. खंडाळा येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. महाबळेश्वर शहरात मंगळवारी आठवडी बाजार होता. निवडणुकीतील मतदान प्रक्रिया मंगळवारीच असल्याने प्रशासनाने ऐनवेळी आठवडी बाजार रद्द केल्याचा निर्णय घेतल्याने खरेदीसाठी आलेले लोक व विक्रेते यांची चांगलीच धांदल उडाली. नागठाणे, ता. सातारा येथील मतदान केंद्रावर कुठल्याही उमेदवाराला मतदान केले तरी ते भाजपच्या उमेदवारालाच मिळत असल्याची तक्रार तेथील इतर पक्षांच्या उमेदवारांनी केली. याची माहिती मिळताच खासदार उदयनराजे भोसले घटनास्थळी हजर झाले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदान केंद्राला भेट दिली. या मशीनमध्ये त्रुटी असल्याने ती बदलण्याची सूचना आमदारांनी केंद्राध्यक्षांना केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांच्या सूचनेनंतर ही मशीन बदलण्यात आली. २ हजार ५८४ मतदान केंद्रांवर १६ हजार ९८२ निवडणूक कर्मचारी कार्यरत होते. ५ हजार ८९४ पोलिस अधिकारी व कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवून होते. ठळक घटनानागठाणे, ता. सातारा केंद्रावर कुठल्याही उमेदवाराला मतदानकेले तरी एकाच उमेदवाराला मिळत असल्याचा आक्षेप घेतल्यानंतर मशीन बदलण्यात आलीसातारा तालुक्यात एकूण तीन मशीन बदलल्याशाहूपुरी, ता. सातारा येथे प्रशासनाने ऐनवेळी मतदार याद्या पुरविल्यामिरजे, ता. खंडाळा येथेउशिरापर्यंत मतदानतरडगावला अनेकजण मतदार यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित