लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेला ६८ लाख रुपये ढोबळ नफा झाला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाराम जाकलेकर व राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे यांनी दिली.
राजाराम जाकलेकर म्हणाले, आष्टा शहर सहकार पंढरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सहकारातून समृद्धी निर्माण झाली. आष्टा शहरातील विविध मान्यवरांनी सहकार वाढविण्यासाठी प्रयत्न केला. यामुळे आष्टा शहरात बँका व पतसंस्थांचे जाळे निर्माण झाले. राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेने महापूर असो की कोरोना संकट प्रत्येक वेळी सभासद, ठेवीदार यांच्या हिताचा विचार करून त्यांना मदतीचा हात दिला आहे. संस्थेच्या ठेवी १० कोटी ६५ लाख, कर्जे ७ कोटी ५१ लाख, गुंतवणूक ४ कोटी १३ लाख, कर्जवसुली ९९.५ टक्के झाली आहे. संस्थेचे कामकाज संगणकीकृत असून लॉकरची सुविधा आहे. संस्थेकडे आरटीजीएस, एनईएफटीची सुविधा आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमित कदम, आनंदराव खोत, भगवान काळे, बाबासाहेब नायकवडी, विजय मोरे, जगन्नाथ बसूगडे, पंडित माळी, भगवान पवार, सरोजिनी शिंदे, विजया शेटे, विश्वास टोमके, सचिव नियाजूलहक नायकवडी उपस्थित होते. यावेळी आष्टा दक्षिण भाग सोसायटीचे संचालक बाबासाहेब शेळके यांचा सत्कार करण्यात आला.