शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कोविड सेंटरमधून ६५२ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 18:02 IST

CoronaVirus Sangli : सांगली महापालिकेच्या मिरज तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (जीपीएम) कोविड सेंटरमधून गेल्या २१ दिवसांत ६५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १६६ रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये सर्वच रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संकटात महापालिकेच्या कोविड सेंटरने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा आधार दिला आहे.

ठळक मुद्देमहापालिका कोविड सेंटरमधून ६५२ जण कोरोनामुक्तसध्या १६६ रुग्ण दाखल : कोरोना संकटात मोठा दिलासा

सांगली : महापालिकेच्या मिरज तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (जीपीएम) कोविड सेंटरमधून गेल्या २१ दिवसांत ६५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १६६ रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये सर्वच रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संकटात महापालिकेच्या कोविड सेंटरने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा आधार दिला आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील रुग्णांची संख्या वाढताच आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आदिसागर मंगल कार्यालय अवघ्या सात दिवसांत शंभर ऑक्सिजन बेडचे सेंटर सुरू केले. या सेंटर्सच्या मदतीसाठी समाजातून अनेक दानशूर व्यक्तींही पुढे आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर सर्व साहित्य महापालिकेने एकत्रित जमा केले. मात्र एप्रिल महिन्यात पुन्हा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताच आयुक्तांनी मिरज तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू केले. तीन ते चार दिवसांतच १२० बेडचे हे सेंटर सुरू झाले.या कोविड सेंटरमध्ये पश्चिम महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. गेल्या २१ दिवसांत ८८३ रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ६५२ कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना कोविडमुक्त करण्यात आले आहे. उपायुक्त स्मृती पाटील आणि साहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय स्टाफ २४ तास अलर्ट आहे. महापालिकेच्या जीपीएम कोविड सेंटरमध्ये ५० ड्युरा सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरविला जात आहे. याचबरोबर रुग्णांना वेळेत जेवणाबरोबर त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी सेवा बजावित आहेत. रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.एकही मृत्यू नाहीमहापालिका अतिक्रमण विभागाकडून दररोज २ ते ३ ड्युरा सिलिंडर पोहोच करण्याचे कामही दैनंदिन सुरू आहे. यासाठी ८० जणांचा स्टाफ कार्यरत आहे. या २१ दिवसांत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. याचबरोबर व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या ६५ रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले. जीपीएममधून रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली