शिराळा : तालुक्यात २३ गावामध्ये बुधवारी ६५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सलग नवव्या दिवशी रुग्णसंख्या घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शिराळा, मांगले, सांगाव, वाकुर्डे बुद्रुक हॉटस्पॉट गावे झाली आहेत.
मांगले ८, शिराळा ७, सांगाव ६, चिखली, चिंचोली, नाटोली प्रत्येकी ३, अंत्री बुद्रुक, बिऊर, मादळगाव, रिळे, तडवळे, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी २ यासह २३ गावात ६५ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ६०५ ॲक्टिव्ह रुग्ण असून गृहविलगीकरण कक्ष ५२६ , संस्था विलगीकरण कक्ष ८, उपजिल्हा रुग्णालय ३९, कोकरुड ग्रामीण रुग्णालय १९, खाजगी रुग्णालय १२, स्वस्तिक कोविड सेंटर १ असे रुग्ण उपचार घेत आहेत.