शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एसटीचे ६१ लाख प्रवासी घटले, मात्र सांगली विभागात ४ लाख वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:53 IST

प्रसाद माळी सांगली : राज्यात ऑक्टोबरमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ६१ लाख प्रवासी घटल्याने एसटीला मोठ्या तोट्यास सामोरे जावे ...

प्रसाद माळीसांगली : राज्यात ऑक्टोबरमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ६१ लाख प्रवासी घटल्याने एसटीला मोठ्या तोट्यास सामोरे जावे लागले. मात्र, सांगली विभागाने दिवाळीमध्ये केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे ऑक्टोबरमध्ये ४ लाख ८३ हजार प्रवासी वाढले. राज्यात एसटी पीछाडीवर असली, तरी सांगली विभागाने मात्र प्रवाशांची मने जिंकत त्यांची संख्या वाढवण्यात आघाडी घेतली आहे.यंदाच्या ऑक्टोबरमध्ये सांगली विभागाने विविध कल्पक गोष्टी राबवत आणि नियोजनावर भर देत गर्दीच्या मार्गावर वाहने वाढवली. शटल सेवांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली. ग्रामीण वाहतुकीवर भर दिला. प्रवाशांची गैरसुविधा टाळली, याचे फळ त्यांना मिळाले असून, विभागाला अधिक फायदा मिळविण्यात यश आले आहे. सांगली विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी (प्र.) सतीश पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक (चालान) प्रवीण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आगारांतील आगारप्रमुख, वाहतूक निरीक्षकांनी प्रयत्नपूर्वक विभागासाठी सामूहिक यश प्राप्त केले.गतवर्षीच्या तुलनेत विविधस्तरावर वाढस्तर / ऑक्टोबर २०२४ / ऑक्टोबर २०२५ / यंदाची वाढउत्पन्न / २० कोटी ७६ लाख ४८ हजार / २५ कोटी २ लाख २७ हजार / ४ कोटी २५ लाख ७९ हजारप्रवासी संख्या / ८४ लाख ९७ हजार / ८९ लाख ८० हजार / ४ लाख ८३ हजारकिलोमीटर / ७३ लाख ५४ हजार / ७७ लाख ३२ हजार / ३ लाख ७८ हजारगर्दीच्या मार्गावर कार्यरत फेऱ्यांमध्ये अधिकची वाढमार्ग / फेऱ्यासांगली - कोल्हापूर / ८सांगली - इचलकरंजी / १२मिरज - कोल्हापूर / ४मिरज - इचलकरंजी / ६ईश्वरपूर - कोल्हापूर / ८आटपाडी - सांगली / ४तासगाव - सागंली /६विटा - सांगली / ४जत - सागंली / ६पलूस - सांगली / ४

आगारनिहाय प्रतिदिवस सरासरी वाहनाचा वापरसांगली : ८५, मिरज : ८०, विटा : ७३, ईश्वरपूर : ७०, तासगाव : ६७, जत : ७६, आटपाडी : ५५, कवठेमहांकाळ : ५९, शिराळा : ५०, पलूस : ३८, एकूण : ६५३

प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न

  • लांब व मध्यम फेऱ्यांच्या वाहतुकीत वाढ केली.
  • पुणे वाहतुकीसाठी जादा १५०, तर मुबंई वाहतुकीसाठी जादा १० वाहनांची सोय.
  • आरक्षण नोंदणीची वेळ वाढवली.
  • रातराणी वाहतुकीत वाढ.
  • वाहनांच्या बिघाडांची संख्या रोखण्यात यश
  • मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन
  • पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना मार्गनिहाय फेऱ्यांचे पालकत्व सोपवले.
  • व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागप्रमुखांचे आगारप्रमुखांना वेळोवेळी मार्गदर्शन

सांगली विभागीय कार्यालयाने सर्व १० आगारांचे विविध पातळ्यांवर सुयोग्य नियोजन केले होते. प्रवासी मागणीनुसार, गर्दीच्या व ग्रामीण मार्गावर वाहने व त्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर केला गेला. आगारस्तरावर चांगला प्रतिसाद मिळाला. चालक, वाहक व अधिकारी यांच्या मेहनतीमुळे विभागाला प्रवासी संख्या वाढविण्यात यश मिळाले. - सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra ST Loses Passengers, Sangli Division Sees Increase

Web Summary : Maharashtra ST faced passenger decline, but Sangli division increased ridership by 4.83 lakhs through better planning, increased rural services, and optimized resource use during Diwali.