शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांकडून ६०.४४ लाख टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:46 IST

जिल्ह्यात १२ सहकारी आणि खासगी सहा असे १८ कारखाने आहेत. यापैकी सहकारी दहा आणि खासगी पाच अशा पंधरा साखर ...

जिल्ह्यात १२ सहकारी आणि खासगी सहा असे १८ कारखाने आहेत. यापैकी सहकारी दहा आणि खासगी पाच अशा पंधरा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाले होते. जिल्ह्यात टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि आरफळ योजनांमुळे दुष्काळी भागामध्ये उसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे जिल्ह्याचे उसाचे क्षेत्र ७७ लाख हेक्टरवरुन एक लाख हेक्टरपर्यंत गेले आहे. पंधरा कारखान्यांनी ६० लाख ४४ हजार ५९३ टन उसाचे गाळप करुन ६९ लाख ८३ हजार ९०९ क्विंटल साखर तयार केली आहे. जिल्ह्यात आणखी २५ ते ३० लाख टन ऊस शिवारात असून तो वेळेत गाळपासाठी जावा, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. राजारामबापू कारखान्याच्या जत युनिटने कार्यक्षेत्रातील उसाचे शंभर टक्के गाळप पूर्ण केले आहे. पहिलाच हंगाम असल्यामुळे एक लाख ५१ हजार टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्याचा गळीत हंगाम येत्या दोन दिवसात बंद होणार आहे. राजारामबापू कारखान्याच्या वाळवा तालुक्यातील तीन युनिटनी १३ लाख ६६ हजार टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सात लाख टन ऊस शिल्लक असून २५ मार्चपर्यंत त्या उसाचे गाळप पूर्ण होईल, असे त्यांच्या व्यवस्थापनाचे मत आहे. दि. ३१ मार्चअखेर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद होणार आहेत.

वसंतदादा-दत्त इंडिया कारखान्याने ६ लाख ५८ हजार २२० टन उसाचे गाळप झाले असून ७ लाख ६६ हजार ८९० क्विंटल साखर तयार केली आहे. या कारखान्याने कार्यक्षेत्रातील शंभर टक्के उसाचे गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांती, हुतात्मा, विश्वास, सोनहिरा, उदगिरी शुगर, मोहनराव शिंदे या कारखान्यांसमोरही शिल्लक ऊस गाळपाचे मोठे आव्हान आहे. कारखाना प्रशासनाच्या माहितीनुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखान्यांचे गळीत हंगाम चालू राहणार आहेत.

चौकट

कारखाने गाळप टन साखर उत्पादन क्विंटल उतारा टक्के

वसंतदादा-दत्त इंडिया ६५८२२० ७६६८९० ११.६५

राजारामबापू साखराळे ६७२४१५ ७९९३०० ११.८९

विश्वास-चिखली ४८८४८० ५४६३०० ११.१८

हुतात्मा-वाळवा ४०८९४० ४६७८७५ ११.४४

राजारामबापू-वाटेगाव ३९४०४० ४७८१०० १२.१३

तासगाव-तुरची १०४८९० ११११५० १०.६०

राजारामबापू-डफळे १५१०४० १४७२७० ९.७५

साेनहिरा-वांगी ६५५०९५ ७६४४२० ११.६७

क्रांती-कुंडल ६५५८५० ७८४०६० ११.९५

राजारामबापू-सर्वोदय २९९८६० ३६६६६० १२.२३

मोहनराव शिंदे २५५००० २८८४०० ११.३१

निनाईदेवी-दालमिया २७६८९० ३३८२७५ १२.२२

यशवंत-नागेवाडी १०८८९२ ११३२९० १०.४०

उदगिरी शुगर ४२०१६० ४७९६९० ११.४२

श्री श्री रवीशंकर-राजेवाडी ४९४८२१ ५३२२२९ १०.७६

एकूण ६०४४५९३ ६९८३९०९ ११.५५