शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

कुंभारीच्या लिपिकाकडून ६० लाखांचा अपहार, सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेत असताना मारला डल्ला

By हणमंत पाटील | Updated: May 23, 2024 17:26 IST

संचालकाचा नातेवाईकही अपहारात

सांगली : दुष्काळी निधी अपहारप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने तिघांवर कारवाई केली आहे. या चौकशीत कुंभारी (ता. जत) शाखेतील कर्मचारी संजय पाटील (रा. शिरगाव, ता. तासगाव) यांनी अपहार केल्याचे पुढे आले आहे. ते तासगाव मार्केट यार्ड शाखेत काम करत असताना त्यांनी सुमारे ६० लाखांचा अपहार केला आहे. या शाखेची तपासणी सुरू असून, संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यावर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीवर बॅँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेतील कर्मचारी योगेश वजरीनकर याने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निमणी शाखेतही असाच प्रकार पुढे आला. त्या शाखेतील कर्मचारी प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदत निधीतील २१ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. त्यानंतर संपूर्ण तासगाव तालुक्यातील शाखांची तपासणी सुरू करण्यात आली.या अपहारप्रकरणी संचालक मंडळाची सोमवारी तातडीने बैठक घेण्यात आली. त्यात वजरीनकर, कुंभार यांच्यासह तासगाव मार्केट यार्ड शाखाधिकारी एम. वाय. हिले या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. चौकशीनंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्याशिवाय सलग पाच वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच शाखांची तपासणी करण्यात येणार आहे. तासगाव शाखेची तपासणी करत असताना या शाखेतील तत्कालीन कर्मचारी संजय पाटील (सध्या कुंभारी, ता. जत) याने सुमारे ६० लाखांचा अपहार केल्याचे पुढे आले आहे. पाटील यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर काही दिवसांपूर्वी तडकाफडकी कुंभारी येथे बदली करण्यात आली होती. चार वर्षांपूर्वी ते तासगाव शाखेत कार्यरत होते. त्यावेळी हा अपहार त्यांनी केला असल्याचा संशय आहे.

संचालकाचा नातेवाईकही अपहारातजिल्हा बॅँकेत सध्या गाजत असलेल्या शासनाच्या दुष्काळी, अवकाळी मदत निधीतील अपहारात बॅँकेच्या एका संचालकाचा नातेवाईकच अडकला आहे. या घोटाळ्यात त्याचे नाव पुढे येताच संबंधित संचालकाने बॅँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून चौकशीपूर्वीच घोटाळ्याची रक्कम भरून घेण्यास भाग पाडले. तसेच या नातेवाईकाचे नाव रेकॉर्डवर येऊ नये, यासाठी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालवला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँकfraudधोकेबाजी