शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

महापालिकेकडून ५६ मोबाईल टॉवर सील

By admin | Updated: March 26, 2017 23:34 IST

थकबाकीपोटी कारवाई : मोबाईल कंपन्यांची धावपळ; जप्तीसाठी धडक मोहीम

सांगली : महापालिकेने थकीत करापोटी मालमत्ता धारकांसह आता मोबाईल कंपन्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. रविवारी सुटीदिवशी महापालिकेच्या कर संकलन पथकाने तीनही शहरातील ५६ मोबाईल टॉवर सील केले. या कंपन्यांकडे ३ कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. टॉवर सील केल्यानंतर मोबाईल कंपन्यांची धावपळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत कंपन्यांचे प्रतिनिधी महापालिकेच्या कर विभागात तळ ठोकून होते. महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी थकीत कर वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या दहा दिवसांत कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्यासाठी पाच वॉरंट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात एकाचवेळी मालमत्ता जप्तीची धडक मोहीम सुरू आहे. गेल्या चार दिवसात विविध सहकारी संस्था, साखर कारखाना, पतसंस्थांसह वैयक्तिक मालमत्ता सील केल्या जात आहेत. रविवारी मालमत्ताधारकांपाठोपाठ मोबाईल कंपन्यांच्या टॉवरवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. सांगलीत नितीन शिंदे, काका हलवाई, काका तांबोळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील विविध भागात असणारे ५६ मोबाईल टॉवर सील केले. यात सर्वच मोबाईल कंपन्यांचा समावेश होता. सांगलीत २६, मिरजेत २७, तर कुपवाड परिसरातील तीन टॉवर सील झाले. या मोबाईल कंपन्यांकडे तीन कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे. मध्यंतरी मोबाईल कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. डिसेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मोबाईल कंपन्यांची याचिका निकाली काढली असून, महापालिकांना कर वसुलीचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेने वारंवार या मोबाईल कंपन्यांना नोटिसा बजावून थकीत कर भरण्याचे आदेश दिले. पण मार्च महिना संपत आला तरी मोबाईल कंपन्यांकडून फारशी हालचाल झाली नव्हती. त्यात रविवार हा सुटीचा दिवस निवडून महापालिकेने टॉवरवर कारवाईचा बडगा उगारला. एकेक टॉवर सील होत गेल्याने शहरातील मोबाईल सेवा विस्कळीत झाली. ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागताच मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे धाव घेतली. सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे हे दिवसभर कर विभागात थांबून आढावा घेत होते. मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी वाघमारे यांची भेट घेऊन, ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरू, टॉवरचे सील काढा, अशी विनंती केली. पण वाघमारे यांनी कर भरल्याशिवाय सील काढले जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. रात्री उशिरापर्यंत मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी थकबाकीचा नेमका आकडा घेत होते. येत्या दोन दिवसात थकीत करापोटी धनादेश देऊ, अशी आर्जवही करीत होते. (प्रतिनिधी)