शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४८७ जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र, येथील शासकीय रुग्णालयात वेळेत उपचार होत असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र, येथील शासकीय रुग्णालयात वेळेत उपचार होत असल्याने सर्पदंश झालेल्यांचे प्राणही वाचत आहेत. त्यामुळेच वर्षभरात ४८७ जणांना सर्पदंश झालेला असतानाही मृत्यूचे प्रमाण कमी असून वर्षभरात चाैघांचा मृत्यू झाला आहे. २०१९ पेक्षा सर्पदंशाच्या घटनांमध्ये मात्र वाढ झाली आहे.

शेतीमध्ये काम करत असताना किंवा अडगळीत वस्तू घेताना विशेषकरून सर्पदंशाच्या घटना घडत असतात. त्यातही थंडीच्या दिवसात गारव्याच्या ठिकाणी सर्पदंशांच्या घटना वाढतात.

सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर आणि शेजारच्या कर्नाटक राज्यातील सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात सर्वांत प्रभावी उपचार केले जातात. अगदी जहाल विषारी सापाचा दंश झालेला असला तरी वेळेत उपचार सुरू केल्यास व प्राथमिक खबरदारी घेतल्यास त्या रुग्णाचा जीव वाचल्याची अनेक उदाहरणे आहेत. जिल्ह्यात सर्पदंशासह उंदीर, विंचू, श्वानदंशाच्याही घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. यावरही जिल्हा रूग्णालयात तातडीने उपचार केले जात आहेत.

चौकट

साप चावताच काय काळजी घ्यावी

बेसावधपणे कुठे हात घातला किंवा पाय पडला तर सर्पदंश होऊ शकतो. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीने घाबरून जावू नये. सुरूवातीला दंश झालेला साप कोणता आहे याची माहिती घेतल्यास बराच ताण कमी होऊ शकतो तरीही दंश झालेल्या ठिकाणी दाह होत असल्यास तातडीने त्या जवळ दोरीने घट्ट आवळून प्रवाह शरीरात भिनणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबरच त्याठिकाणी छोटाचा व्रण करून तेथील रक्त काढणेही प्रभावी ठरू शकते.

साप चावताच काय काळजी घ्यावी

चौकट

जिल्ह्यात आढळणारे साप

जिल्ह्याची भौगोलिक रचना वेगळी असल्याने आढळणारे सापही वेगवेगळे आहेत. त्यातही नाग, घोणस या विषारी सापांचे प्रमाण आहे याशिवाय धामण, गवत्या आदी सापांचेही प्रमाण आढळत आहे. जास्त अडगळ असलेल्या ठिकाणी घोणससारखा साप आढळतो तर शेतामध्ये, वारूळाजवळ आणि गारवा असलेल्या भागात नागाचे प्रमाण असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

चौकट

दोन वर्षांतील घटना

महिना २०१९ २०२०

जानेवारी २६ १९

फेब्रुवारी १९ १३

मार्च २५ २०

एप्रिल ३१ ३५

मे ३८ ३६

जून ४९ ६५

जुलै ५७ ८४

ऑगस्ट ३८ ३३

सप्टेंबर ३६ ५२

ऑक्टोबर २७ ७०

नाेव्हेंबर २४ ५३

डिसेंबर १८ ०७