सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे ४७५ रुग्ण आढळून आले, तर ६६३ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा एक अंकी झाला आहे.
मंगळवारी महापालिका क्षेत्रात ५२ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत ६४, मिरजेत ६ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ४४, जत ३२, कडेगाव ६६, कवठेमहांकाळ २७, खानापूर १००, मिरज ६०, पलूस ०७, शिराळा ३, तासगाव ६१, वाळवा २३; तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, कर्नाटकातील १५ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील ९ जणांचा मृत्यू झाला. त्यात आटपाडी, जत, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी १, मिरज व वाळवा प्रत्येकी दोन, तर महापालिका क्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. सध्या ६०८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या ४५२५ चाचण्यांत २२१ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ६५४४ चाचण्यांत २६९ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,८९५७५
कोरोनामुक्त झालेले : १,८०३८५
आतापर्यंतचे मृत्यू : ४,९८९
उपचाराखालील रुग्ण : ४२०१
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : ४६
मिरज : ६
आटपाडी : ४४
जत : ३२
कडेगाव : ६६
कवठेमहांकाळ : २७
खानापूर : १००
मिरज : ६०
पलूस : ०७
शिराळा : ०३
तासगाव : ६१
वाळवा : २३