सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत गुरुवारी घट होत ४२५ जणांची नोंद झाली. रुग्णसंख्येसह मृत्यूसंख्याही घटल्याने दिलासा मिळाला आहे. परजिल्ह्यातील ४ जणांसह जिल्ह्यातील ७ अशा ११ जणांचा मृत्यू झाला. ४५० जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील मृत्यूसंख्येत घट होत ७ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, आटपाडी, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी २, पलूस, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
उपचार घेत असलेल्या ४१०६ रुग्णांपैकी ६१४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५२४ जण ऑक्सिजनवर, तर ९० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाने गुरुवारी आरटीपीसीआरअंतर्गत ४४२० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १७८ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ६२९५ जणांचे नमुने तपासणीतून २५१ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील ४ जणांचा मृत्यू, तर नवीन ४ जण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९०४९८
उपचार घेत असलेले ४१०६
कोरोनामुक्त झालेले १८१३८०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५०१२
गुरुवारी दिवसभरात
सांगली ५२
मिरज २
आटपाडी २२
कडेगाव २२
खानापूर ७६
पलूस १७
तासगाव ३९
जत २१
कवठेमहांकाळ २६
मिरज तालुका ६७
शिराळा ३
वाळवा ७८