शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरावर पाच वर्षात ४000 रोपे- गुड न्यूज-ठिबकने पाणी : किल्लेमच्छिंद्रगड येथील अवलियाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 23:33 IST

निवास पवार ।शिरटे : सुमारे चार हजार वृक्षांची लावण, वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन, डोंगरावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम, यातून २५०० रोपांना ठिबकने पाणी. ही धडपड आहे किल्लेमच्छिंद्रगडातील एक अवलियाची. शिवकुमार पाटील हे त्याचे नाव.किल्लेमच्छिंद्रगडावर (ता. वाळवा) पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गडवड, पिंपळ, जांभूळ, साग, पायरन, चिंच, आवळा, सीताफळ आदी ...

निवास पवार ।शिरटे : सुमारे चार हजार वृक्षांची लावण, वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन, डोंगरावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम, यातून २५०० रोपांना ठिबकने पाणी. ही धडपड आहे किल्लेमच्छिंद्रगडातील एक अवलियाची. शिवकुमार पाटील हे त्याचे नाव.

किल्लेमच्छिंद्रगडावर (ता. वाळवा) पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गडवड, पिंपळ, जांभूळ, साग, पायरन, चिंच, आवळा, सीताफळ आदी देशी वाणाच्या सुमारे चार हजार रोपांची लावण केली आहे. वृक्ष संगोपनासाठी आमदार जयंत पाटील यांनी २०० फुटापर्यंत कूपनलिका खुदाई करुन दिली होती. परंतु हे पाणी सर्व झाडांना पुरत नव्हते. नंतर शिवकुमार पाटील यांनी स्वखर्चाने वाढीव कूपनलिका खुदाई केली. तेथून वरपर्यंत पाईपलाईन केली. डोंगरमध्यावर टाकी बांधून २५०० रोपांना ठिबक केले आहे. या उपक्रमाची वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान यांनी पाहणी केली. त्यांच्यासमवेत संतोष इंगवले, प्रकाश साळुंखे, सुहास पाटील, सचिन साळुंखे, हणमंतराव मोरे, सिकंदर जमादार, राहुल पाटील उपस्थित होते.

 

किल्लेमच्छिंद्रगडावर पूर्वी सीताफळाची खूप झाडे होती. परंतु वृक्षतोडीमुळे ती नष्ट झाली. सीताफळाचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे, यासाठी पुढील वर्षापासून याठिकाणी सीताफळाची लागवड करणार आहे. बीजांपासून रोपे तयार करण्याचे काम चालू केले आहे.- शिवकुमार पाटील, किल्लेमच्छिंद्रगड