शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

जतमधील मरिआई कुटुबांवरील बहिष्कार मागे ४० वर्षांनंतर न्याय : अंनिस व भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:17 IST

जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला.

सांगली : जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला. याप्रकरणी कोळी कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भटक्या विमुक्त हक्क परिषदेची मदत घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे धाव घेतली होती. पोलिसांनी जातपंचायतीला सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा दाखविला होता.

मारुती कोळी (रा. जत) यांना त्यांच्या मरिआई (कडकलक्ष्मी) समाजाने तब्बल ४० वर्षे बहिष्कृत केले होते.अंनिस व भटक्या समाज संघटनेच्या प्रयत्नांमुळे जत पोलिसांनी जातपंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा दाखवला. तेव्हा पंचांनी नरमाईची भूमिका घेऊन मारुती यांना समाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. पंचांच्याहस्ते पान-सुपारी देऊन मारुती कोळी यांच्या कुटुंबास मरिआई समाजात ४० वर्षांनी घेतले. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.

मारुती कोळी जतमधील स्टिल कॉलनीत बुद्धवा व नागव्वा या दोन पत्नींसह मुलगी शीतल, सोनल, मुले राहुल, बालाप्पा, भीमाण्णा यांच्यासह राहतात. मरिआईचा (कडकलक्ष्मी) गाडा घेऊन गावोगावी देवीचा महिमा सांगून अंगावर आसूडाचे फटके मारुन धान्य व पैसे गोळा करतात. लग्नापूर्वी त्यांची पहिली पत्नी बुद्धवा यांच्या वडिलांना रिवाजाप्रमाणे पाच हजारांची दक्षिणा दिली होती; पण जात पंचायतीस काही दिले नाही; तसेच लग्न करण्याची परवानगीही घेतली नव्हती. त्यामुळे पंचायतीने त्यांना एक लाखाचा दंड केला. हा दंड त्यांनी भरलाही, पण पंचायतीने आणखी दोन लाखाच्या दंडाची मागणी केली. कोळी यांनी पैसे नसल्याचे सांगताच, पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. तो ४० वर्षे कायम होता.

कोळी यांनी या अन्यायाविरोधात अंधश्रध्दा निर्मूलन समिती व भटक्या विमुक्त हक्क परिषदेशी संपर्क साधला. अंनिसने त्यांना घेऊन जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार दिली. त्यांनी जत पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तासीलदार यांनी जात पंचायतीच्या पंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कार कायद्याची माहिती दिली.या कायद्याचा बडगा दाखविताच पंचांनीही नरमाईची भूमिका घेत बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. कोळी यांचा पंचांच्याहस्ते पानसुपारी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांचा ४० वर्षांचा वनवास गुरुवारी संपला. भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे विकास मोरे, गणेश निकम, नितीन मोरे, अतुल कांबळे, दयानंद मोरे, हवालदार विजय वीर, अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, कार्यवाह राहुल थोरात यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन कुटुंबाला न्याय मिळाला.जात पंचायत नरमलीसामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही कारणाने स्वजातीतून बहिष्कृत करता येत नाही. पोलिसांनी जात पंचायतीच्या पंचांना या कायद्याचा बडगा दाखविताच त्यांनी नरमाईची भूमिका घेऊन मारूती कोळी यांच्या कुटुंबावरील बहिष्कार उठवला. दोन्ही मुलींची लग्ने समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे पार पाडू, कोळी यांच्या कुटुंबास समाजाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात योग्य तो मान देऊ, असेही पंचांनी लेखी दिले.