शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

सांगलीतील ४० टक्के जलवाहिन्या जीर्ण, यंत्रणेत बदलाची गरज 

By अविनाश कोळी | Updated: July 17, 2024 23:54 IST

वारणा योजनेत नव्या पाईपलाईनचा समावेश

सांगली : शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेत अद्याप ४० टक्के जलवाहिन्या या पन्नास वर्षापूर्वीच्या आहे. त्या जीर्ण झाल्या असून त्या बदलल्यास पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम होऊ शकते. सातत्याने होत असलेले पाणी गळतीचे प्रकार रोखण्यासाठी जलवाहिन्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता आहे.

गावठाणात बहुतांशी जुन्या लाईन आहेत. काहीठिकाणी १९७०च्या तर काहीठिकाणी १९५०च्या जलवाहिन्या आहेत. जुन्या जलवाहिन्यांमुळे वारंवार पाणीगळतीच्या समस्येचा सामना महापालिकेला करावा लागतो. दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ येते. या सर्व दुष्टचक्रातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेला ही यंत्रणा बदलण्याची गरज आहे. सांगलीतील माळबंगला येथील ५६ एमएलडीचा जुना प्रकल्पही कालबाह्य झाल्याने तोही बदलावा लागेल. यातून शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.

९०० किलोमीटरचे अंतरसांगली, कुपवाड शहरातील जलवाहिन्या एकूण ९०० किलोमीटर अंतरात विस्तारल्या आहेत. त्यातील ४०० ते ४५० किलोमीटर अंतराच्या पाईपलाईन्स या पन्नास वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत. त्या बदलण्याची आवश्यकता आहे.

वारणा योजनेत समावेशवारणा उद्भव योजनेचा २९० कोटीचा प्रस्ताव सध्या शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या योजनेतच जुन्या पाईपलाईन बदलणे, नव्या १५ टाक्या बांधणे तसेच अन्य कामांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेच्या मंजुरीची महापालिकेला प्रतीक्षा आहे.

...तर पाणीपुरवठा यंत्रणा सक्षमजुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्यास पाणीपुरवठा यंत्रणेचे सक्षमीकरण होणार आहे. पाणी गळतीचे प्रकार अत्यल्प होतील. विस्तारीत भागात आता चांगल्या जलवाहिन्या बसविण्यात आल्यामुळे गळतीचे प्रकार त्याठिकाणी दिसत नाहीत.

गावठाणातच अधिक समस्यासांगलीच्या गावभाग, खणभाग, फौजदार गल्ली, स्टँड परिसर, राजवाडा अशा गावठाणातच जुन्या जलवाहिन्या अधिक आहेत. त्यामुळे त्यांच्या गळतीनंतर पाण्याच्या समस्येला याच भागाला अनेकदा सामोरे जावे लागते. नव्या योजनेनंतर गावठाणातील समस्या दूर होऊ शकते.

टॅग्स :Sangliसांगली