तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल सोमवारी वाजले. निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार सोमवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर ४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन तुल्यबळ गट आमने-सामने येणार आहेत. काँग्रेसकडूनही ताकद अजमावण्यात येणार आहे. या निवडणुकीने नेत्यांच्याही वर्चस्वाचा फैसला होणार असल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.तासगाव बाजार समितीच्या निवडणुका, पाठोपाठ तासगाव नगरपालिकेतील कुरघोडीचे राजकारण यामुळे तालुक्यातील भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी विविध कारणांनी सर्व गावे पिंजून काढलेली आहेत. ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवून तालुक्यावर वर्चस्व अबाधित राखण्यासाठी दोन्ही पक्षांकडून सर्व बळ अजमावून या निवडणुका लढविल्या जाणार असल्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.निवडणूक होणाऱ्या ३९ ग्रामपंचायतींपैकी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील १६ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या १६ गावांकडे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर यांचेही लक्ष आहे. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे इच्छुकांनीही मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून तालुक्यात महिनाभर या निवडणुकांचा धुरळा उडताना दिसणार आहे. (वार्ताहर)या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार विसापूर, आळते, शिरगाव (वि.), निंंबळक, बोरगाव, हातनोली, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, धामणी, हातनूर, गोटेवाडी, पाडळी, धोंडेवाडी, नरसेवाडी, नागाव कवठे, कवठेएकंद, सावळज, कौलगे, लोढे, डोर्ली, वज्रचौंडे, येळावी, जुळेवाडी, राजापूर, तुरची, गौरगाव, वाघापूर, लोकरेवाडी, वडगाव, दहीवडी, डोंगरसोनी, गव्हाण, धुळगाव, ढवळी, सिध्देवाडी, यमगरवाडी, जरंडी.निवडणूक कार्यक्रम असा अर्ज दाखल : १३ ते १७ आॅक्टोबरअर्ज छाननी : १९ आॅक्टोबरअर्ज माघार : २१ आॅक्टोबरमतदान :१ नोव्हेंबरमतमोजणी :४ नोव्हेंबर
३९ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले
By admin | Updated: September 28, 2015 23:48 IST