शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Sector Sangli : सांगलीत विनापरवाना व जादा दराने खत विक्रीबद्दल ३३ परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 17:42 IST

Agriculture Sector Sangli : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. खतांचाही पुरेसा साठा केला असल्याची माहिती कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली.

ठळक मुद्देसांगलीत विनापरवाना व जादा दराने खत विक्रीबद्दल ३३ परवाने निलंबिततक्रार करण्याचे कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी केले आवाहन

सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. खतांचाही पुरेसा साठा केला असल्याची माहिती कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली. जादा दराने खत विक्री केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, खरीपासाठी ४ हजार ५६५ मेट्रिक टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे, पैकी आजअखेर २५०० मेट्रिक टन स्टॉक झाला आहे.केंद्र शासनाने खतासाठी जादा अनुदान जाहीर केल्याने खतांच्या किंमती नियंत्रणात आल्या आहेत. शेतकऱ्यांना सुधारित कमी झालेल्या किंमतीत खते उपलब्ध व्हावीत यासाठी सूचना दिल्या आहेत. सर्व खत कंपनी प्रतिनिधी व वितरकांना ऑनलाईन बैठकीतून सक्त आदेश दिले आहेत. जादा दराने खताची विक्री केल्यास विक्री परवाना निलंबित करण्यात येणार आहे. दुकानाचा परवानाही कायमस्वरूपी रद्द करण्याचा इशारा मास्तोळी यांनी दिला.जिल्ह्यात खताचे घाऊक व किरकोळ असे एकूण ३ हजार १७५ वितरक आहेत. १५ एप्रिलपासून सहा नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. निविष्ठा गुणनियंत्रणासाठी ३२ गुणनियंत्रण निरीक्षक व ११ भरारी पथके नेमली आहेत. निविष्ठा वितरकांची तपासणी व बियाणे, खते, औषधांचे नमुने घेण्यात येत आहेत. परवाना नुतनीकरण नसल्याने तसेच जादा दराने खत विक्री केल्याबद्दल ३३ परवाने निलंबित केले आहेत.

यामध्ये मिरज २, वाळवा १०, शिराळा २, खानापूर २, तासगाव ७ ,कडेगाव, पलूस, आटपाडी प्रत्येकी १, कवठेमंकाळ ३ व जतमधील ४ दुकानदारांचा समावेश आहे. येत्या २९ व ३० मे रोजी जिल्ह्यातील सर्व निष्ठा वितरकांची तपासणी भरारी पथकांमार्फत केली जाणार आहे.तक्रार करण्याचे आवाहनजादा दराने निविष्ठा किंवा खतांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच जिल्हा स्तरावरील सहा नियंत्रण कक्षांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन मास्तोळी यांनी केले. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगली