शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पहिल्याच दिवशी २९०० महिलांचा अर्ध्या तिकिटात फुल्ल प्रवास, बसस्थानकात महिलांची मोठी गर्दी 

By संतोष भिसे | Updated: March 18, 2023 16:58 IST

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या महिलाही हुशारी दाखवत योजनेचा फायदा घेऊ लागल्या

सांगली : महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीच्या पहिल्याच दिवशी सांगली आगारातून २९०३ महिलांनी प्रवास केला आहे. अर्ध्या तिकिटात प्रवासाचा फायदा मिळवताना बसस्थानके महिला प्रवाशांनी भरुन गेल्याचे दिसत आहे. सांगलीत स्थानकात शनिवारी दुपारी महिलांची मोठी गर्दी होती. शिवाय प्रत्येक बसमध्ये महिला मोठ्या संख्येने होत्या. कोल्हापूर - सांगली - जत या एसटीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त संख्येने महिलाच दिसून आल्या. शुक्रवारी महामंडळाने अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना अंमलात आणली, पण महिलांना त्याची पुरेशी माहिती नव्हती. तरीही रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल २ हजार ९०३ महिलांनी सांगली स्थानकातून विविध मार्गांवर अर्ध्या तिकिटात प्रवास केला. अनेक महिलांना वाहकाने निम्मे पैसे घेतल्यावरच योजना सुरु झाल्याची माहिती मिळाली.सांगलीतून जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, विटा, शिराळा या गावांना एसटीचे तिकीट जास्त आहे, पण सवलतीमुळे महिलांनी पैसे वाचल्याचा आनंद व्यक्त केला. विशेषत: सांगली, मिरजेला वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा झाला आहे.कर्नाटकी महिलांची चालाखीकर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या महिलाही हुशारी दाखवत योजनेचा फायदा घेऊ लागल्या आहेत. कर्नाटकातून येताना महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीमध्ये बसायचे. सीमेपर्यंत फुल्ल तिकीट काढायचे, आणि महाराष्ट्र हद्दीत आल्यावर मात्र वाहकाकडून सवलतीचे अर्धे तिकीट घ्यायचे अशी आयडियाची कल्पना त्यांनी लढवल्याचे वाहकांनी सांगितले. यामुळे कर्नाटकातूनही महाराष्ट्राच्या गाड्यांना प्रवासी मिळू लागले आहेत.पासधारकांना तूर्त लाभ नाहीअनेक नोकरदार महिला महिन्याकाठी पास काढून प्रवास करतात. सध्या अर्ध्या तिकिटाची सवलत सुरु झाली असली, तरी पासधारक महिलांना लगेच त्याचा फायदा मिळणार नाही. पासची मुदत संपल्यानंतर, नवा पास काढतेवेळीच लाभ मिळणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिला