शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

२९ मोबाईल टॉवर सील

By admin | Updated: June 19, 2014 00:57 IST

साडेचार लाखांची वसुली : कंपन्यांची धावाधाव

सांगली : महापालिकेने विनापरवाना मोबाईल टॉवरवर सलग दुसऱ्यादिवशी कारवाईची मोहीम सुरूच ठेवली. आज, बुधवारपर्यंत २९ टॉवर सील करण्यात आले. त्यापैकी तीन टॉवरच्या कंपन्यांनी साडेचार लाख रुपयांचा कर भरला आहे. पालिकेच्या कारवाईने मोबाईल कंपन्यांची धावाधाव सुरू झाली आहे. महापालिका हद्दीत २०० टॉवर्स आहेत. त्यापैकी ५७ जणांनी परवाना घेतला आहे, तर ७० प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित ६४ टॉवर्स विनापरवाना सुरू आहेत. काल, मंगळवारी स्थायी समितीत टॉवरवरील कारवाईवरून झालेल्या गदारोळानंतर प्रशासनाला जाग आली. टॉवर सील करण्यासाठी उपायुक्त सुनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली चार प्रभागांसाठी चार पथके तयार करण्यात आली. काल रात्री उशिरापर्यंत १३ टॉवर सील केले होते. आज दुसऱ्यादिवशीही प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवली.दिवसभरात एकूण २९ टॉवर्स सील करण्यात आले. त्यातील तीन टॉवरपोटी मोबाईल कंपन्यांनी साडेचार लाख रुपये भरले. त्यानंतर या टॉवरचे सील काढण्यात आले. बीएसएनएलने अकरा टॉवरची रक्कम भरण्यासाठी महापालिकेकडे दोन दिवसांची मुदत मागितली आहे. पालिकेनेही बीएसएनएलला मुदत दिली असून, त्यांच्याकडून दोन दिवसात २८ लाख रुपये वसूल होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. टॉवर्स सील केले असले तरी, बॅटरी बॅकअप्मुळे दोन दिवस शहरातील नेटवर्क सुरू राहील. त्यानंतर नेटवर्क बंद पडणार असल्याने कंपन्यांची धावाधाव सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)