शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत 274 शिक्षकांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या, पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून नियुक्तीपत्रे

By संतोष भिसे | Updated: June 15, 2024 14:34 IST

निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रशासन निवडणूक कामात गुंतल्याने नियुकत्या लांबल्या होत्या.

सांगली :  पवित्र पोर्टलमधून जिल्ह्यात दाखल झालेल्या 274 शिक्षकांना अखेर शुक्रवारी रात्री नियुक्त्या देण्यात आल्या. गेल्या साडेतीन महिन्यांपासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रशासन निवडणूक कामात गुंतल्याने नियुकत्या लांबल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नूतन शिक्षकांना जिल्ह्याची भौगोलिक रचना समजावून सांगत शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृध्दींगत करावी, असे आवाहन केले.

जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पवित्रमधील शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड  उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमधूप 481 शिक्षकांची मागणी केली होती, त्यापैकी 274 शिक्षक प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे. मार्च महिन्यात शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर आचारसंहिता व्ही नियमित शिक्षकांच्या बदल्यामुळे नियुक्त्या लांबल्या होत्या. जिल्हा परिषदेत चार दिवसांपासून शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरु होती, ही प्रक्रिया संपताच पवित्र पोर्टलमधून आलेल्या 274 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली.  रात्री उशिरापर्यंत पदस्थापना देण्याचे काम सुरु होते.

 जिल्ह्याचा शैक्षणिक रोड मॅप तयार असून शिक्षकांनी तो समजून घ्यावा. जिल्हा परिषदेचा नावलौकीक आहे, त्याला बाधा येणार नसल्याची दक्षता घ्यावी असे आवाहन धोडमिसे यांनी केले.

पहिल्या दिवशीच हजर होण्याचे आदेशउन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळा शनिवारपासून (दि. 15) झाल्या. पवित्र पार्टलमधील शिक्षकांना शाळा देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरुच होते. त्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी या शिक्षकांनी हजर व्हावे असे आदेश धोडमिसे यांनी दिले.

बहुतांश शिक्षक मराठवाड्यातूनपवित्र पोर्टलमधून आलेले बहुतांश शिक्षक मराठवाड्यातील आहेत. सर्रास शिक्षकांना जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळा तालुक्यात नियुक्त्या मिळाल्या आहेत. प्रत्येक शाळेला पुरेसे शिक्षक मिळतील याची दक्षता घेतल्याचे धोडमिसे म्हणाल्या. 

टॅग्स :Teacherशिक्षकGovernmentसरकारSchoolशाळा