शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
3
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
4
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
5
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
6
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
7
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
8
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
9
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
10
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
11
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
12
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
13
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
14
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
15
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
16
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
17
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
18
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
19
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
20
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

नोंदणी २५ हजार जणांची, लसी आल्या केवळ तीन हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

सांगली : कोरोनाच्या लसीची प्रतीक्षा अखेर बुधवारी संपुष्टात आली. जिल्ह्यासाठी २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी झाली असून पहिल्या ...

सांगली : कोरोनाच्या लसीची प्रतीक्षा अखेर बुधवारी संपुष्टात आली. जिल्ह्यासाठी २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी झाली असून पहिल्या टप्प्यात केवळ तीन हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाच्या मोहिमेस येत्या शनिवार (दि. १६) नंतर सुरुवात होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्यात एकूण १७ केंद्रांवर ही लसीकरण मोहीम चालणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात नऊ ठिकाणी व महापालिका क्षेत्रात आठ ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन केले आहे. अद्याप जिल्ह्याला लसी प्राप्त झालेल्या नसून, त्या दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. लसीकरणाची रंगीत तालीम नुकतीच झाली आहे. संबंधित केंद्रांवर डॉक्टर व कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्यावर लसीकरणाची जबाबदारी दिली आहे. एका केंद्रावर एका दिवसात जास्तीत जास्त १०० जणांना लस दिली जाणार आहे. आरोग्य यंत्रणेने याबाबतची तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा आढावा घेतला आहे. सुरुवातीला नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

कोणत्या बूथवर दिली जाणार लस

ग्रामीण भागात कवठेमहांकाळ, इस्लामपूर, आटपाडी, तासगाव, पलूस, कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये लस दिली जाणार आहे. चिंचणी (ता. तासगाव), कुरळप (ता. वाळवा) आणि कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण होणार आहे. महापालिका क्षेत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज व सांगली शासकीय रुग्णालये, भारती विद्यापीठ येथे लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.

लसीकरण कोणाला व कधी?

जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरुवातीला लस दिली जाणार आहे. त्यांना त्या संदर्भातील संदेश मोबाईलवर प्राप्त होईल. जसा लसीचा साठा प्राप्त होतील, त्यानुसार प्राधान्यक्रमाने वेगवेगळ्या घटकांसाठी लसीकरण केले जाणार आहे.

कोट

जिल्ह्यात शनिवार (दि. १६) पासून लसीकरण सुरू होणार आहे. एका दिवसानंतर मोहीम थांबणार नाही. लसी मिळत राहतील त्या प्रमाणात केंद्रसंख्या वाढवून ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. सध्या तीन हजार लसी प्राप्त झाल्या आहेत.

- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी