शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात जीएसटी संकलनात २५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:24 IST

जिल्ह्यात वस्तू व सेवा कराची वसुली सुरू झाल्यानंतर यावर्षी जुलैपासून सहा महिन्यात कर संकलनात २५ टक्के वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षी सुमारे ८७२ कोटी जीएसटी कर वसुली झाली होती. यावर्षी जुलै ते डिसेंबरपर्यंत सुमारे

ठळक मुद्देवाढ १३५ कोटींची -करदात्यांची नोंदणी दहा टक्क्यांनी वाढली; ३0 टक्के व्यापाऱ्यांकडे कराची थकबाकी

मिरज : जिल्ह्यात वस्तू व सेवा कराची वसुली सुरू झाल्यानंतर यावर्षी जुलैपासून सहा महिन्यात कर संकलनात २५ टक्के वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षी सुमारे ८७२ कोटी जीएसटी कर वसुली झाली होती. यावर्षी जुलै ते डिसेंबरपर्यंत सुमारे १३५ कोटी जादा करवसुली झाली आहे. गतवर्षीच्या सहामाहीच्या तुलनेत ही वसुलीची रक्कम २५ टक्के जास्त आहे. करदात्यांच्या नोंदणीतही दहा टक्के वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील दहा तालुक्यात २० हजार नोंदणीकृत व्यावसायिक आहेत. ८७२ कोटी करवसुली झाली होती. १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील करवसुलीचा ७७७ कोटींचा आकडा गतवर्षी ८७२ कोटींपर्यंत पोहोचला होता. चालूवर्षी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. सुमारे २६ हजार व्यावसायिकांकडून चालू वर्षात जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांत ८७२ कोटी करवसुली झाली आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने, अन्न प्रक्रिया उद्योग, औद्योगिक संस्था, गृहबांधणी व्यावसायिक, बांधकाम ठेकेदार यांसह पायाभूत सुविधा देणाºया उद्योजक व व्यावसायिकांकडून वस्तू व सेवा कराच्या वसुलीद्वारे कर संकलनात वाढ झाली आहे.

नोंदणीकृत ३० टक्के व्यावसायिकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे अद्याप कर भरलेला नाही. त्यांच्याकडून दंडात्मक कारवाईसह करवसुली झाल्यानंतर महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वस्तू व सेवा कराची आकारणी सुरू झाल्यानंतर करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ५० हजारापेक्षा जादा किमतीच्या माल वाहतुकीसाठी ई-वे बिलाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. मालवाहतुकीच्या तपासणीसाठी काही ठिकाणी चेकपोस्ट सुरु केले आहेत. सांगली जिल्ह्यात म्हैसाळ ते जतपर्यंत २२० किलोमीटर कर्नाटक सीमा असल्याने, रस्ते तपासणी पथके तैनात केली आहेत.

मार्केट यार्डातील कर वसुली १ फेब्रुवारीपासूनया कारवाईविरोधात व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन सुरू केल्याने मार्केट यार्डातील कोट्यवधीचे व्यवहार ठप्प आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतरही सेवा कर वसुलीचे कामकाज थांबवण्यात आलेले नाही. १ फेब्रुवारीपासून थकीत सेवा कर व्यापाºयांकडून वसूल करण्यात येणार आहे. सांगलीनंतर तासगाव व अन्य ठिकाणी अडत व्यापाºयांकडून सेवा कर वसुली करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.सांगली मार्केट यार्डात हळद, गूळ व बेदाण्याचे १३०० व्यापारी असून,त्यापैकी १०० व्यापाºयांना मागील पाच वर्षांच्या थकीत सेवा कर वसुलीच्या नोटिसा जीएसटी विभागाने दिल्या आहेत.केंद्रीय, राज्य जीएसटी विभागाकडील संकलन वाढतेय...केंद्रीय व राज्य जीएसटी विभागाची सहा महिन्यातील स्वतंत्र जीएसटी वसुली आहे.१३५ कोटी --सहा महिन्यात केंद्रीय जीएसटी विभागाची वसुली४०० कोटी --राज्य जीएसटी विभागाची एकूण वसुली

टॅग्स :SangliसांगलीGSTजीएसटी