शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ढवळेश्वरात जंतनाशक गोळ्या खाल्ल्याने २५ बालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित मोफत जंतनाशक औषध वाटप मोहिमेचा भाळवणी (ता. खानापूर) गावात प्रारंभ होत असतानाच, तेथून पाच किलोमीटरवरील ढवळेश्वर येथे अंगणवाडीतील बालकांनी वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर, चक्कर, उलट्या, पोट दुखणे, असे त्रास सुरू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्यामुळे २५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित मोफत जंतनाशक औषध वाटप मोहिमेचा भाळवणी (ता. खानापूर) गावात प्रारंभ होत असतानाच, तेथून पाच किलोमीटरवरील ढवळेश्वर येथे अंगणवाडीतील बालकांनी वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर, चक्कर, उलट्या, पोट दुखणे, असे त्रास सुरू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्यामुळे २५ बालकांना विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यातील आठ बालकांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा प्रचंड हादरली असून, जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम तातडीने थांबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.जिल्हा परिषदेने राष्टÑीय जंतनाशक दिनानिमित्त दि. १८ व २३ आॅगस्ट या दोन दिवशी १ ते १९ वयोगटातील मुलांना शाळेत जाऊन मोफत जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवार, दि. १८ रोजी सकाळी भाळवणी येथील उर्दू शाळेत या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. भाळवणी येथे हा कार्यक्रम सुरू असतानाच ढवळेश्वर येथील तीन अंगणवाड्यांतील मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मुलांना पाच ते दहा मिनिटातच चक्कर येणे, उलट्या होणे, डोळ्यावर झापड येणे, अंग थरथरणे असे प्रकार सुरू झाले. काही लहान मुले जमिनीवर कोसळली. त्यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पालकांना दिल्यानंतर पालकांनी मिळेल त्या वाहनाने मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे यांच्यासह शहरातील खासगी डॉक्टरांचे पथक तातडीने रुग्णालयात दाखल झाले. मुलांवर उपचार सुरू झाल्यानंतर नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. आ. अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, गोपीचंद पडळकर, संग्रामसिंह देशमुख, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रह्मानंद पडळकर, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, अमोल बाबर, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार सौ. रंजना उबरहंडे, सुहास पाटील, सौ. कविता घाडगे यांनी रुग्णालयात येऊन बालकांची विचारपूस केली.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम थांबविण्यात आली आहे.आठ जणांना सांगलीला हलविलेसंग्राम सुभाष किर्दत, विश्वजित सुभाष पवार, विराज धनाजी किर्दत, गायत्री रमेश किर्दत, ऋतुराज भरत गुजले, अथर्व सुभाष थोरात, स्वरा किरण मंडले, नेहा रूपेश किर्दत या आठ बालकांना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.