सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे २४ कोरोना रुग्ण आढळून आले, तर २० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १२० रुग्ण उपचाराखाली असून, त्यातील ३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
महापालिका क्षेत्रात मंगळवारी सांगलीत ८, तर मिरजेत ४ रुग्णांची नोंद झाली. खानापूर तालुक्यांत चार, जत व शिराळा तालुक्यात प्रत्येकी एक, तर कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्ण आढळून आले. आटपाडी, कडेगाव, पलूस, तासगाव, मिरज या पाच तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या १५४ चाचण्या करण्यात आल्या, त्यात १६ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या ५४८ चाचण्यांत ११ रुग्ण सापडले. सध्या ३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर ३२, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर २, तर नाॅन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ३ रुग्ण आहेत. तर रत्नागिरीतील एक व सातारा जिल्ह्यातील दोन असे तीन नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.