शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबर महिन्यात २२६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा शेतकºयांची खºयाअर्थाने दिवाळी आनंदाची होत आहे.मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस फारसा समाधानकारक नसल्यामुळे शेतकºयांसह जिल्हा प्रशासनही चिंतेत होते. जुलै, आॅगस्ट महिन्यात दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु होते. चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकºयांनी पशुधनासह वाळवा, पलूस तालुक्याकडे स्थलांतर केले होते. दि. १५ आॅगस्टनंतर मात्र जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरअखेरपर्यंत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांची चिंता काही प्रमाणात मिटली होती. साधारणत: शासकीय दफ्तरी तर सप्टेंबरला पाऊस थांबतोच, असे चित्र आहे. पण यावर्षी शासकीय दफ्तरी पाऊस थांबला असला तरी, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने शेतकरी समाधानी आहे. आॅक्टोबर महिन्यात सरासरी ४९.७ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता असताना, यावर्षी दि. १ ते १६ आॅक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधित ११२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाची टक्केवारी २२६ आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक २९६.७ टक्के, तर जत तालुक्यात २७३.५ टक्के पाऊस झाला आहे. आटपाडी, पलूस आणि शिराळा तालुक्यातच १०० ते १८३ टक्के पाऊस झाला असून उर्वरित तालुक्यात २०० टक्केहून जास्त पावसाची पाटबंधारे विभागाकडे नोंद झाली आहे.दुष्काळग्रस्तांना दिलासा : नदीकाठी नाराजीनेहमी आॅक्टोबर महिन्यात उष्णता असते. पण यावेळी याच महिन्यात सलग पंधरा दिवस पाऊस सुरु असल्यामुळे वातावरणात गारवा आहे. दुष्काळी तालुक्यातील तलावही तुडुंब भरले असून, सर्व परिसर हिरवागार झाला आहे. नदीकाठच्या भागातील सोयाबीन, भात, भुईमूग शेंगा काढणीचा हंगाम सुरू आहे. याच कालावधित सलग पंधरा दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत.