शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पिकल्या पानाचा दर की हो भलता!, खाऊच्या पिवळ्या पानांना सोन्याचा भाव

By श्रीनिवास नागे | Updated: March 22, 2023 15:29 IST

उन्हाळ्यात फक्त कळीच्या पानांनाच मागणी

सांगली : उन्हाळ्याची धग वाढत असताना पानबाजारात मात्र पिवळ्या खाऊच्या पानांना सोन्याचा भाव मिळत आहे. पान व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते.मिरज तालुक्यात पानमळ्याचे २५० हेक्टर क्षेत्र आहे. या व्यवसायावर लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. पान उत्पादक शेतकरी, खुडेकरी, वेल बांधणारे वेलके, पान वखारदार, वाहतूकदार, पान टपरीवाले अशा क्षेत्रांचा मागोवा घेतला तर यामध्ये अनेक बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले आहे. पान व्यवसाय जरी नाशवंत मालाची विक्री करणारा असला तरी दररोज यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, रत्नागिरी, मालवण, फोंडा, चिपळूण, खेड, सांगोला, पंढरपूर आदी प्रमुख पान बाजारपेठेतून पानांची विक्री होते.सध्या पानबाजारात ३०० पिवळ्या पानांच्या एका कवळीची किंमत २०० ते २५० रुपये आहे. हा दर पिवळ्या मोठवड पानांनाच मिळत आहे. एका केळीने लपेटलेल्या पान डप्प्यात (गठ्ठ्यात) तीन हजार पाने विशिष्ट पद्धतीने लावून बाजारात विक्रीसाठी आणली जातात. पानांमध्ये फाफडा व कळी असे दोन प्रकार पडतात. उन्हाळ्यात फक्त कळीच्या पानांनाच मागणी असते.फापड्याच्या पानांना जूनपासून पुढे मागणी येते; कारण याचवेळी फापडा खुडण्यास येतो. पानमळ्यास उन्हाळ्यात पाणी जास्त लागते. मळ्यात नेहमी गारवा असावा लागतो; तरच पाने मोठवड व पिवळी फुटतात. सध्या १० कवळीच्या ३००० पानांच्या एका डप्प्याची किंमत दोन हजार ते अडीच हजार रुपये आहे. हा दर असाच टिकून राहिल्यास पान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली