शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 05:10 IST

नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे.

सांगली : अभूतपूर्व अशा महापुरात जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांचे सुमारे ४,००० कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकच नव्हेतर, सर्वसामान्य माणूनही उद्ध्वस्त झाला आहे.नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. दुकानातील चिखल, पाण्याने भिजलेला माल काढण्यामध्येच व्यापारी व्यग्र आहेत. काही छोट्या दुकानदारांनी व्यवहार सुरू केले असले तरी नव्वद टक्के बाजारपेठ बंदच आहे. केवळ धान्य व्यापाऱ्यांचेच अंदाजे २५० कोटींवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.गणपती पेठेत धान्याचे मोठे व्यापारी असून, त्यांची गोदामेही तेथेच आहेत. शिवाय मसाले, कॉस्मेटिक व इतर साहित्याची दोनशेहून अधिक दुकाने आहेत. पुरामध्ये सर्वांत मोठे नुकसान गणपती पेठेचे झाले आहे. मिठापासून धान्यापर्यंत सारे काही पुराच्या पाण्यात भिजले आहे. धान्य कुजण्यास सुरुवात झाली आहे. कडधान्यांना कोंब फुटले आहेत. मसाल्याच्या पदार्थांचेही मोठे नुकसान झाले आहे. पेठेतील व्यापारी दुकाने आणि गोदामांमधील घाणीची स्वच्छता करण्यातच व्यग्र होते. किरकोळ दुकानदारांनी स्वच्छता करून व्यवहार सुरू केले आहेत. पण, त्यांचे प्रमाण केवळ १० टक्केच होते. सोमवारपासून येथील व्यवहार सुरळीत होतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.धान्य व्यापारी व चेंबर आॅफ कॉमर्सचे संचालक अण्णासाहेब चौधरी म्हणाले, गणपती पेठेतील धान्य व्यापाºयांचेच जवळपास २५० कोटींचे नुकसान झाले आहे. हजारो क्विंटल गहू, ज्वारी, तांदूळ, कडधान्य भिजले आहे. उर्वरित व्यापाºयांच्या नुकसानीचा आकडा हजार कोटीपर्यंत जाईल. सर्वेक्षणानंतरच नुकसानीचे खरे आकडे समोर येणार आहेत. कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरामुळे वाळवा, पलूस, मिरज, शिराळा तालुक्यातील ६९०० एकरावरील भाजीपाला १५ दिवस पाण्यात राहिल्याने पूर्णत: सडला आहे. यात उत्पादकांचे सुमारे ७० कोटींचे नुकसान झाले.

३५०० कोटींचा फटका : संजय पाटीलमहापुरामुळे विविध क्षेत्रांतील नुकसान अंदाजे साडेतीन हजार कोटींच्या घरात आहे. ते पूर्ण भरून निघणार नसले तरी, पूरग्रस्तांना दिलासादायक मदत देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दिली.रस्त्यांचे मोठे नुकसानमहापुराने सांगली जिल्ह्यात वीज, पाणीपुरवठा, संपर्क यंत्रणांसह रस्त्यांचीही मोठी हानी झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या रस्त्यांचे एकूण सुमारे २५0 कोटी रुपयांचे नुकसान झाले.महावितरणची ४७ कोटींची हानीमहापुराचा महापालिकेसह जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार तालुक्यांतील १६ उपकेंद्रांसह चार हजारांहून अधिक रोहित्रे, मीटर पाण्यात बुडाल्यामुळे बंद पडली होती. महावितरणचे ४७ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर